Gold Price: भारतात सोन्याची मागणी 30 टक्क्यांनी घटली; आज सोने, चांदीच्या भाव वधारला

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 30 October 2020

मागील दोन दिवसांत सोन्याचे दर उतरताना दिसले होते. आज भारतीय बाजारपेठेत सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात वाढ झाली आहे.

नवी दिल्ली: मागील दोन दिवसांत सोन्याचे दर उतरताना दिसले होते. आज भारतीय बाजारपेठेत सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात वाढ झाली आहे. एमसीएक्सवर डिसेंबरमधील सोन्याचे दर 0.28 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅमला 50 हजार 425 रुपये झाले तर चांदीच्या दरात 0.7 टक्क्यांची वाढ होऊन चांदी प्रति किलो 60 हजार 577 रुपयांवर गेली आहे. मागील सत्रात सोने 0.45 टक्क्यांनी घसरले होते तर चांदीत सौम्य वाढ झाली होती. 
 
जागतिक बाजारपेठेतील किंमत-
जागतिक बाजारपेठेत अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने आणि सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. पण अमेरिकी प्रोत्साहन पॅकेजबाबत अनिश्चितता असताना हा नफा मर्यादित होता. आज जागतिक बाजारपेठेत सोने 0.2 टक्क्यांनी घसरून 1870 डॉलर प्रति औंस झाले आहे. तसेच डॉलरचा निर्देशांकही 0.14 टक्क्यांनी घसरला आहे. 

Corona Impact: भारतातील लक्झरी कारचा व्यवसाय 5 ते 7 वर्षांनी मागे, 'Audi'चा अंदाज

सोन्याची मागणी 30 टक्क्यांनी कमी: WGC
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (WGC) अहवालानुसार, कोरोनामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने सप्टेंबर तिमाहीत भारतात सोन्याची मागणी 30 टक्क्यांनी घसरून 86.6 टन झाली आहे. सप्टेंबर 2019च्या तिमाहीत सोन्याची एकूण मागणी 123.9 टन होती. किंमतीच्या आधारावर गेल्या वर्षीच्या 41 हजार 300 कोटी रुपयांच्या तुलनेत सोन्याची मागणी चार टक्क्यांनी घसरून 39 हजार 510 कोटी रुपये झाली. 

भारताकडे सोन्याचा किती साठा आहे-
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या  (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे. 

कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?

दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढू शकतात-
दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढू शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठू शकते. दिवाळीनंतर सोने प्रति १० ग्रॅमला 53 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(edited by- pramod sarawle)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold demand in India declined by 30 percent Gold and silver prices rose today