Corona Impact: भारतातील लक्झरी कारचा व्यवसाय 5 ते 7 वर्षांनी मागे, 'Audi'चा अंदाज

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 25 October 2020

कोरोनामुळे भारतातील ऑटोउद्योगाला खूप मोठा तोटा झाला आहे. 

नवी दिल्ली: कोरोनामुळे संपुर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. मागील काही दिवसांपासून भारतात कोरोना आटोक्यात येताना दिसत आहे. पण कोरोनाकाळात झालेले जागतिक नुकसान अपरिमित आहे. तसेच  भारतातील उद्योगधंद्याला याचा मोठा फटकाही बसला आहे. कोरोनामुळे भारतातील ऑटोउद्योगाला खूप मोठा तोटा झाला आहे. 

एकदा चार्जिंग केल्यानंतर 210 किलोमीटर पळणार स्कूटर; जाणून भन्नाट फिचर्स

भारतातील ऑटोउद्योगाच्या नुकसानीबद्दल बोलताना ऑडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लॉकडाऊनमुळे भारतातील लक्झरी कार व्यवसाय पाच ते सात वर्षे मागे गेला आहे. 2014-15 वर्षीच्या बरोबरीचा व्यवसाय होण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील असंही या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

कोरोनानंतर हळूहळू परिस्थितीत सुधारणा होईल आणि ऑटोउद्योग पुढील दोन- तीन वर्षात मोठी भरारी घेईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. वर्षाच्या शेवटी-शेवटी गाड्यांच्या विक्रीत वाढ होत आहे त्यामुळे बाजारात सकारात्मक भावना निर्माण होत आहे. तसेच पुढच्या वर्षीही विक्री वाढ होईल, अशी माहिती ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग ढिल्लन यांनी दिली.

कोरोनाकाळात Mutual Fundमध्ये गुंतवणूक कुठे आणि कशी कराल?

2014-15 वर्षी विकल्या गेलेल्या कारची बरोबरी लगेच करता येणार नाही, त्यासाठी पुढले वर्ष जाईल अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे हा व्यवसाय पाच ते सात वर्षांनी मागे गेला आहे, ही माहितीही धिल्लन यांनी दिली. भारतात 2014 साली 30 हजार लक्झरी कारची विक्री झाली होती. तर 2015 मध्ये  जवळपास 31 हजार लक्झरी कार विकल्या गेल्या होत्या. 

भारतीय लक्झरी कार बाजारपेठेत मर्सिडीज (Mercedes), बीएमडब्ल्यू (BMW), ऑडी (Audi), जेएलआर (JLR) आणि व्होल्वो (Volvo) या आघाडीच्या पाच लक्झरी कार निर्मिती कंपनींचा समावेश आहे. या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत 2018 आणि 2019 साली अनुक्रमे 40 हजार 340 आणि 35 हजार 500 लक्झरी कारची विक्री केली आहे. 

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in india luxury car segment pushed back  by 5 7 years audi said