सणासुदीतही सोने, चांदीची चमक कमी

पीटीआय
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

स्थानिक पातळीवर आज सोने आणि चांदीला मागणी कमी राहिली. भाव जास्त असल्यामुळे सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवरही ग्राहकांकडून खरेदीचा जोर कमी आहे. यातच जागतिक पातळीवर भाव घसरल्याचा परिणामही दिसून आला.

नवी दिल्ली : सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर मागणी घटल्याने सोने आणि चांदीच्या भावाला मंगळवारी फटका बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 150 रुपये आणि चांदीच्या भावात 290 रुपयांची घसरण आज नोंदविण्यात आली. 

स्थानिक पातळीवर आज सोने आणि चांदीला मागणी कमी राहिली. भाव जास्त असल्यामुळे सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवरही ग्राहकांकडून खरेदीचा जोर कमी आहे. यातच जागतिक पातळीवर भाव घसरल्याचा परिणामही दिसून आला. दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 150 रुपयांनी कमी होऊन 38 हजार 905 रुपयांवर आला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 290 रुपयांची घट होऊन 48 हजार 318 रुपयांवर आला. 

जागतिक पातळीवरही आज सोने आणि चांदीच्या भावात आज घट झाली. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 497 डॉलरवर आला तर चांदीचा भाव प्रतिऔंस 17.81 डॉलरवर आला. जागतिक पातळीवरील भूराजकीय तणावामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार चर्चेतून निघणाऱ्या तोडग्यावर आगामी काळातील सोन्याच्या भावातील मोठे चढउतार अवलंबून असतील, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक तपन पटेल यांनी दिली. 

मुंबईत भाव किरकोळ वधारले 
मुंबईतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 33 रुपयांनी वधारुन 37 हजार 969 रुपयांवर गेला. याचवेळी स्टॅंडर्ड सोन्याचा भावही तेवढीच वाढ होऊन 37 हजार 817 रुपयांवर पोचला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 35 रुपयांनी वधारून 46 हजार 100 रुपयांवर गेला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold falls on weak demand