सोन्याच्या आयातीत ऑक्टोबरमध्ये दुप्पट वाढ

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी दुपटीने वाढली असून, ऑक्टोबर महिन्यात देशात 3.5 अब्ज डॉलर रकमेच्या सोन्याची आयात झाली आहे. 

गेल्या आठ महिन्यापासून सोने आयात करण्याचे प्रमाण कमी झाले होते. गेल्यावर्षी याच काळात देशात 1.67 अब्ज डॉलर सोने आयात झाले होते. चांदीची आयात मात्र 49 टक्क्यांनी घसरली आहे. या काळात देशात 181.93 दशलक्ष डॉलरची चांदी आयात झाली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 355.38 दशलक्ष डॉलरएवढा होता.

सोन्याची आयात वाढल्याने ऑक्टोबर महिन्यातील व्यापारी तूट 10.16 अब्ज डॉलरवर पोचली आहे. आयातवाढीचा दागिने उद्योगावर व चालू खात्यातील तुटीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
Web Title: gold import doubled in october

टॅग्स