

सोन्याचे दागिने वापरायला कोणाला आवडत नाही? सोनं हे कैक शतकांपासून समृद्धीचं प्रतीक मानण्यात आलं आहे. आपल्याकडे सणांच्या दिवसात सर्वात आधी सोन्याचे दर वधारतात. अगदी भावी पिढ्यांना वारसा म्हणून देणं असेल किंवा संकट काळात वापरासाठी आर्थिक पर्याय म्हणून आपण त्याचा वापर करतो. त्यामुळे सोन्याचं महत्त्व आजही अबाधित आहे. परंतु सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे सोनं खरेदी करणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे.
मात्र, आजही बाजारभाव कमी-जास्त झाले, तरी लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात. गुंतवणुकीच्या बाबतीत, सोनं हा सुरक्षित पर्याय आहे. दीर्घ काळापासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतोय.
म्युच्युअल फंडांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यात 500 रुपयांचे सोने देखील खरेदी करू शकता. तुम्ही SIP द्वारे दरमहा सोन्यात गुंतवणूक करू शकता. सध्या लोकांचा कल वास्तविक सोन्यात गुंतवण्याऐवजी इतर पर्यायांकडे जात आहे. कारण अस्सल सोने खरेदी करण्याची प्रत्येकाची आर्थिक कुवत नसते.
थेट सोनं खरेदीला अन्य पर्याय आल्यापासून सामान्य माणसानेही सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. गोल्ड बॉण्ड्स, गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंडाद्वारे सोन्यात गुंतवणूक करता येते. चांगला परतावा मिळवण्यासाठी गोल्ड म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित मार्ग आहे. येथे गुंतवणूक करून तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांप्रमाणे देखभाल करण्याची गरज नाही. असे अनेक म्युच्युअल गोल्ड फंड आहेत, ज्यांनी FD पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
५०० रुपयांत सोनं खरेदी करा
म्युच्युअल फंडांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यात 500 रुपयांचे सोने देखील खरेदी करू शकता. तुम्ही SIP द्वारे दरमहा सोन्यात गुंतवणूक करू शकता. इतर कोणत्याही म्युच्युअल फंडाप्रमाणे ही गुंतवणूक करता येते. यासाठी अॅक्सिस गोल्ड फंड, कोटक गोल्ड फंड, एसबीआय गोल्ड फंड आणि एचडीएफसी गोल्ड फंड हे काही गोल्ड फंड आहेत, जे सध्या चांगला परतावा देत आहेत.
कोटक गोल्ड फंड
अशा म्युच्युअल फंड योजनांमध्ये, कोटक वर्ल्ड गोल्ड फंड हा एक आंतरराष्ट्रीय फंड आहे. जो सोन्याच्या खाण कंपन्या आणि त्याचे विपणन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. या योजनांचे परतावे सोन्याच्या दैनंदिन आर्थिक उलाढालींशी जोडलेले आहेत. म्हणून, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एखाद्याने सिस्टेमॅटिक गुंतवणूक योजना (SIP) किंवा हस्तांतरण योजना (STP) वापरावी.
गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन एंडेड उत्पादन आहे जे गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करते. असे अनेक गोल्ड फंड आहेत, ज्यांनी फक्त 3 वर्षात 14 ते 15 टक्के परतावा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.