सोन्याची चमक कमी होतेय? जाणून घ्या त्यामागचे कारण

Gold Price, Business
Gold Price, Business
Updated on

कोरोनाच्या काळात विक्रमी दर नोंदवल्यानंतर आता सोन्याचे दर घसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना लशीसंदर्भातील सकारात्मक बातम्यांमुळे चांदाचे दरावरही परिणाम झाला असून त्यातही घसरण होताना दिसते. ऑगस्टमध्ये विक्रमी दर गाठलेले सोन्याचे दर आता  7425 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढे स्वस्त झाले आहेत.  शुक्रवारी सराफ बाजाात 24 कॅरेट सोन्याचा दर 48829 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. 

7 ऑगस्ट रोजी सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.   प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 56254 रुपये इतके झाले होते. आतापर्यंतचा हा सर्वोच्च दर आहे. याच दिवशी चांदीचे दर 76008 रुपये प्रति किलो इथपर्यंत पोहचले होते.  27 नोव्हेबरपर्यंत या दरात हळूहळू घसरण होताना दिसली. चांदीचे दर 60069 रुपये  प्रति किलो झाले असून यात तब्बल 15939 इतकी घट झाली आहे. 

मागील आठवड्याचा विचार केल्यास सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे लग्न सराईचा काळ असताना ही घसरण पाहायला मिळत आहे. 20 नोव्हेंबरच्या तुलनेत 27 नोव्हेंबरला प्रति 10 ग्रॅममागे 1578 रुपयांनी सोने स्वस्त झाले.  16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सोन्याच्या दरात 839 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचे भाव  2074 रुपयांनी कमी झाले होते.  

दर घसरण्यामागचे कारण 

कोरोना लशीसंदर्भातील सकारात्मकतेमुळं जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेत होणारी सुधारणा हे देखील सोन्याचा भाव कमी होण्यामागचे कारण आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com