
सराफ बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी त्याची किंमत आणखी कमी होईल.
नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. शनिवारी सराफ बाजारामध्ये संमिश्र ट्रेड पहायला मिळाला. सोन्याचा भाव 300 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली आला तर चांदीचा भाव 100 रुपयांनी वाढलेला दिसून आला. जागतिक बाजारातील सोन्याच्या किंमतींचा प्रभाव भारतीय सराफ बाजारावर झालेला दिसून आला.
शुक्रवारी सोन्याच्या किंमतींमध्ये 21 रुपयांच्या तेजीची नोंद झाली. ज्यानंतर आता सोने 49,644 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊन पोहोचले आहे. तर 259 रुपयांच्या घसरणीसह चांदी 66,784 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचले आहे. याआधी गुरुवारी दिल्लीच्या सराफ बाजारामध्ये 194 रुपयांच्या तेजीसह सोने 49,544 रुपये प्रति ग्रॅम झालं होतं. तर 1,184 रुपयांच्या तेजीसह चांदी 66,969 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. तर बुधवारी सोने 49,261 रुपये प्रति 10 ग्रॅमवर तर चांदी 65,785 रुपये प्रति किलो होते.
हेही वाचा - सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कल्चरल रिसर्च सेंटर तसेच लायब्ररी; अशी असेल अयोध्येतील मशीद
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या किंमतीत वाढत्या जागतिक निर्देशांमुळे भारतीय सराफ बाजारातही वाढ दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजाराच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कमकुवत डॉलरमुळे सोन्याच्या किंमतीतील हे चढ-उतार सध्या दिसून येत आहेत. जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.80 डॉलरवरुन घसरुन 1889.60 डॉलर प्रति औंस वर होते. तर चांदी 0.42 टक्क्यांनी घसरुन 26.07 डॉलर प्रति औंसवर राहिली आहे.
या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असली तरी त्याची किंमत आणखी कमी होईल. जागतिक अर्थव्यवस्थेतील सुधार आणि अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी होत असल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी शेअर बाजार सोडत आहेत. हेच कारण आहे की नजीकच्या भविष्यात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ संभव नाहीये. तसेच दीर्घकालीन काळासाठी सोने हा एक चांगला गुंतवणूक पर्याय मानला जातो.