esakal | सोनं-चांदी पुन्हा स्वस्त; पाहा आजच्या किंमती
sakal

बोलून बातमी शोधा

सोनं-चांदी पुन्हा स्वस्त; पाहा आजच्या किंमती

भारतीय बाजारपेठेत लागोपाठ चौथ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे.

सोनं-चांदी पुन्हा स्वस्त; पाहा आजच्या किंमती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

Gold Price Today : सोनं अथवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? असं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण भारतीय बाजारपेठेत लागोपाठ चौथ्या दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. जागतिक बाजारात आर्थिक मंदीचे संकेत असतानाच सोन्याच्या भावांमध्ये दररोज घसरण होत असल्याचं दिसत आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर मंगळवारी प्रति तोळा ४५ हजार रुपयांपेक्षा खाली घसरले आहेत. एमसीएक्स (Multi commodity exchnage) वर सोनं ०.२४ टक्यांनी घसरुन प्रतितोळा ४४ हजार ७९५ रुपयांवर पोहचलं. तसेच चांदी ०.५ टक्यांनी घसरुन प्रतिकिलो ६६ हजार ०१३ रुपये झालं आहे. 

मागील दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव प्रतितोळा 44,500 ते 45,300 या दरम्यान राहिला आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव प्रतितोळा ५६ हजार रुपयांवर पोहचलं होतं. २४ कॅरेटच्या सोन्याची किंमत राजधानी दिल्लीमध्ये प्रतितोळा ४८ हजार २२० रुपये इतकी आहे. त्याशिवाय प्रति तोळा चेन्नईमध्ये ४५ हजार ९५०, मुंबईत ४४ हजार ८०० तर कोलकातामध्ये ४७ हजार २१० रुपये झालं आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकांमध्ये सोन्याचे दर 0.3 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 1733.69 डॉलरवर स्थिरावले आहेत. चांदीच्या दरांमध्येही घसरण पाहायला मिळाली. आतंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 25.55 डॉलर प्रति औंसनं घसरले आहे.  

हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना LTC व्हाऊचर कॅश करण्याची शेवटची संधी, जाणून घ्या सर्वकाही

तज्ज्ञ काय म्हणतात?
सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी काही महिन्यांमध्ये भारतांमध्ये विवाहसोहळ्याचा माहौल असतो. त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच सध्याच्या सोन्याच्या किंमतीमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.  २०२१ मध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा सोन प्रति तोळा ६३ हजार रुपयांपर्यंत पोहचू शकतं. जर सोन्याच्या किंमतीमध्ये इतकी वाढ झाल्यास गुंतवणूकधारकांना मोठा फायदा होऊ शकतो.  
  

loading image