सोनं आजही झालं स्वस्त, जाणून घ्या प्रतितोळ्याचे दर

सोनं आजही झालं स्वस्त, जाणून घ्या प्रतितोळ्याचे दर
Updated on

Gold Price Today :  सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आली आहे. कारण सोमवारी, सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात आर्थिक मंदीचे संकेत असतानाच सोन्याच्या भावांमध्ये दररोज घसरण होत असल्याचं दिसत आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर सोमवारी प्रति तोळा ४५ हजार रुपयांपेक्षा खाली घसरले आहेत. एमसीएक्स (Multi commodity exchnage) वर सोनं ०.१ टक्यांनी घसरुन प्रतितोळा ४४ हजार ९८१ रुपयांवर पोहचलं. तसेच चांदी १.४ टक्यांनी घसरुन प्रतिकिलो ६६ हजार ५६२ रुपये झाली. 

२४ कॅरेटच्या सोन्याची किंमत राजधानी दिल्लीमध्ये प्रतितोळा ४८ हजार ३८० रुपये इतकी आहे. त्याशिवाय प्रति तोळा चेन्नईमध्ये ४६ हजार ३४०, मुंबईत ४४ हजार ९१० तर कोलकातामध्ये ४७ हजार २१० रुपये झालं आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकांमध्ये सोन्याचे दर 5.07 डॉलरनं घसरुन प्रति औंस 1,740.26 डॉलरवर स्थिरावले आहेत. चांदीच्या दरांमध्येही घसरण पाहायला मिळाली. 0.50 डॉलरच्या घसरणीसह चांदीची किंमत 25.74 डॉलर इतकी झाली आहे.  

तज्ज्ञ काय म्हणतात?
सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आगामी काही महिन्यांमध्ये भारतांमध्ये विवाहसोहळ्याचा माहौल असतो. त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच सध्याच्या सोन्याच्या किंमतीमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.  २०२१ मध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा सोन प्रति तोळा ६३ हजार रुपयांपर्यंत पोहचू शकतं. जर सोन्याच्या किंमतीमध्ये इतकी वाढ झाल्यास गुंतवणूकधारकांना मोठा फायदा होऊ शकतो.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com