esakal | Gold prices: पुढील आठवड्यात सोनं महागणार, की स्वस्त होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Gold

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर स्वस्त झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

Gold prices: पुढील आठवड्यात सोनं महागणार, की स्वस्त होणार?

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

- शिल्पा गुजर

'सोने' हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. सोन्याच्या किमतींवर प्रत्येकाचीच नजर असते. गेल्या काही वर्षात सोन्याच्या किंमतीनी उच्चांक गाठला आहे, पण येत्या आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये फार काही बदल होतील याची शक्यता कमी आहे.

या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. स्थिर रुपया आणि इक्विटी मार्केटमधील तेजीमुळे त्याची किंमत घटून 47,487 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मात्र,आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर स्वस्त झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

हेही वाचा: आर्थिक वर्ष 2021-22 पासून तुमची असू शकतात दोन पीएफ खाती

MCX वरील सोने गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांपैकी चारमध्ये घसरल्याचे दिसले. तर कॉमेक्सवर ते $ 10.75 ने वाढल्याचे दिसून आले. अमेरिकेतील कमकुवत रोजगाराच्या आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्ह आर्थिक धोरण कडक करण्यास विलंब करू शकते. यामुळे सोन्याच्या बाजाराला (Bullion)मजबुती मिळेल.

सोने त्याच्या 5, 20 आणि 50 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजपेक्षा जास्त पण 100 आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली व्यापार करत आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्समधून (RSI) सोन्याच्या किंमतींमध्ये कमी बदलाचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा: यापुढे दूरसंचार कंपन्या देणार नाहीत मोबाईल पोर्टिंगवर आकर्षक ऑफर!

सोन्याच्या किंमतींनी $ 1,810 प्रति औंसच्यावर कंसोलीडेशन रेंज ओलांडली आहे. येत्या काही दिवसांमध्ये फेडरल रिझर्व्ह दर वाढ आणि आर्थिक वाढ मंदावण्याचे संकेत न दिल्याने सोन्याची किंमत वाढू शकते, अशी माहिती पटेल यांनी दिली. सीएफटीसीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, आठवड्यात सोन्यातील लाँग पोझिशन्समध्ये (long positions) 4,273 लॉटनी वाढ झाली आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top