लॉकडाऊनमध्येही सोन्या चांदीचे भाव गगनाला; पाहा आजचे दर

वृत्तसंस्था
Wednesday, 15 April 2020

कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जगासह देश लॉकडाउन असताना सोन्या-चांदीचे भाव मात्र वेगानं वाढत आहेत.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जगासह देश लॉकडाउन असताना सोन्या-चांदीचे भाव मात्र वेगानं वाढत आहेत.  सोन्या-चांदीला आंतरराष्ट्रीय बाजारात झळाळी आलेली पाहायला मिळत आहे. ०७ वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरानं आज उच्चांक गाठला आहे. सोमवारी घरेलू वायदा बाजारात सोन्याचे दर आज (ता. १५) ४६ हजार ६०० रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर ४३ हजार ५०० रुपये किलो असा होता.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरातील अनेक व्यापार व्यवसाय कोरोना व्हायरसमुळे ठप्प झाले आहेत. आर्थिक मंदीचं सावट असतानाच सोने-चांदी तेजीत आहेत. गेल्या महिन्यात जगभरातील इक्विटी बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. महिन्याभरापूर्वी सोन्याचे वायदा प्रति औंस १४०० डॉलरच्या आसपास होता, जो आता प्रति औंस १८०० डॉलर झाला आहे. भारतात सोन्याची किंमत ०२ टक्क्यांनी वाढली आहे. काल (ता. १४) मंगळवारी भारतीय कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज बाजार बंद राहिला.

Coronavirus : कोणतीही स्पेशल रेल्वे सोडणार नाही; रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

2020 च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती १८०० डॉलर प्रति औंस म्हणजेच साधारण ५०,००० ते ५५,००० प्रति तोळापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारी अस्थिरता, अर्थव्यवस्थेबाबत असणारी भीती या सर्व कारणांमुळे सोन्याच्या पुढील २-३ वर्षांत आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत २०२० या वर्षात सोन्याच्या किंमतीमध्ये ६७९४ रुपयांची म्हणजेच १७.३१ रुपयांची वाढ झाली आहे. २०२०या वर्षामध्ये सोन्यामधून १५.१९ इतका रिटर्न मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices today hit record high in Lockdown