Gold Prices: दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात घट; चांदी वधारली

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 27 October 2020

ऑगस्ट महिन्यात सोन्याचे भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे प्रति 10 ग्रॅमला  56 हजार 200 पर्यंत गेले होते.

नवी दिल्ली: देशात आज सोन्याच्या दरात घट तर चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते, दिल्ली सराफा बाजारातील आज सोन्याच्या किंमती 137 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅमला 51 हजार 108 रुपयांवर आल्या, तर चांदीचे भाव 475 रुपयांनी वाढून 62 हजार 648 रुपये प्रति किलो झाले आहे. 

या पार्श्वभूमीवर एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमॉडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, भारतात दिल्लीतील सोन्याच्या 24 कॅरटच्या  किंमती घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने किंचित वाढून 1903.6 डॉलर प्रति औंस झाले आणि चांदी प्रति औंस 24.48 डॉलरवर बाजार करताना दिसली.

रुपया वधारला-
देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीवर रुपया सुरुवातीच्या घसरणीतून सावरला आहे. आज रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलणेत 13 पैशांनी मजबूत झाला आणि मंगळवारी आंतरबँकिंग चलन बाजारात प्रति डॉलर 73.71 वर बंद झाला. सोमवारी रुपया प्रति डॉलर 73.84 वर बंद झाला होता. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या डॉलरचा निर्देशांक 0.07 टक्क्यांनी वाढून 93.11 वर पोहोचला. 

बॉयकॉट चायना नावालाच; भारतात चिनी स्मार्टफोनची रेकॉर्डब्रेक विक्री!

सोमवारचे सोन्याचे दर-
सोमवारी सोन्याचा भाव 59 रुपयांनी घसरून 51 हजार 34 रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी 753 रुपयांनी घसरून 62 हजार 8 रुपये प्रति किलो झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने-चांदीचे भाव अनुक्रमे 1901.30 अमेरिकन डॉलर आणि प्रति औंस 24.26 डॉलर होते. डॉलरचा निर्देशांक 0.25 टक्क्यांनी वाढून 93 वर पोहोचला. 

ऑगस्ट महिन्यात सोन्याचे भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे प्रति 10 ग्रॅमला  56 हजार 200 पर्यंत गेले होते. पण मागील काही आठवड्यांपासून सोन्याच्या दर ठराविक किंमतीमध्ये राहिलेले दिसले आहे.

एकदा चार्जिंग केल्यानंतर 210 किलोमीटर पळणार स्कूटर; जाणून भन्नाट फिचर्स

भारताकडे सोन्याचा किती साठा आहे-
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या  (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे. 

दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढू शकतात-
दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढू शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठू शकते. दिवाळीनंतर सोने प्रति १० ग्रॅमला 53 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rate falls other side silver went high