Gold Silver prices: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 18 November 2020

जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम आज भारतीय कमॉडिटी मार्केटमध्ये दिसला. आज सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे.

नवी दिल्ली: जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम आज भारतीय कमॉडिटी मार्केटमध्ये दिसला. आज सोने आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 0.43 टक्क्यांनी घट होऊन 50 हजार 546 प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. मागील सलग 3 दिवसांपासून सोन्याच्या दरात घट झाली आहे. चांदीच्या दरात 0.6 टक्क्यांची घट होऊन चांदी प्रतिकिलो 62 हजार 875 रुपये झाली आहे. 

जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर घसरले-
जगभरातील काही देशांत कोरोनाचा प्रसार अजूनही कमी झालेला नाही. युरोपातील काही देशांत आणि अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी उतरूण प्रति औंस 1876.85 डॉलर  झाले आहे. तर आज चांदी पर प्रति औंस 24.47 डॉलर होती.

गॅस सिलिंडर बुक करताय? तर मग नक्की हे वाचा

भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार- 
भारतात 2020मध्ये सोन्याची आयात वाढून ऑगस्टमध्ये 3.7 अब्ज डॉलर झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 1.36 अब्ज डॉलरची होती. चीननंतर भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. भारतात सोन्यावर 12.5 टक्के आयात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी लागतो. 

मॉडर्ना इफेक्ट-
मॉडर्नाच्या लसीच्या निकालानंतर सोमवारी जागतिक बाजारपेठेत सोने 1.3 टक्क्यांनी घसरले होते. दरम्यान, फेडरल रिझर्व्हचे उपाध्यक्ष रिचर्ड क्लॅरिडा यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना विषाणूंच्या दोन लसींच्या यशस्वी चाचण्यांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल.

Boycott China: भारताशी नडल्याने चीनला 40 हजार कोटींचा तोटा

भारताकडील सोन्याचा साठा- 
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) अहवालानुसार भारतात सध्या 653 मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rate slumps silver have also decreases in Indian market