Gold Price - सोन्यासह चांदीचे दरही वाढले; जाणून घ्या आजचे भाव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

भारतीय बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. दिल्लीतील सराफ बाजारात बुधवारी म्हणजेच 20 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर 347 रुपये प्रति 10 ग्रॅमला वाढले. तर चांदीच्या दरातही वाढ बघायला मिळाली.

नवी दिल्ली - भारतीय बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. दिल्लीतील सराफ बाजारात बुधवारी म्हणजेच 20 जानेवारी 2021 रोजी सोन्याचे दर 347 रुपये प्रति 10 ग्रॅमला वाढले. तर चांदीच्या दरातही वाढ बघायला मिळाली. 

चांदीचा दर प्रतिकिलोमागे 606 रुपयांनी वाढला. याआधी दिल्लीच्या सराफ बाजाराच सोने 48 हजार 411 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. तर चांदी 65 हजार 208 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने-चांदीचे दर महागल्याचं दिसलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्लीतील सराफ बाजारात बुधवारी सोन्याचे दर 347 रुपयांनी वाढले. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 48 हजार 758 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले आहेत. याआधी सोन्याचा दर 48 हजार 411 रुपये इतका होता तर आंतरराष्ट्री बाजारात आज सोन्याचा दर 1854 डॉलर प्रति औंस इतका आहे. चांदीच्या दरातही बुधवारी वाढ झाली. दिल्लीतील सराफ बाजारात चांदीचे दर 606 रुपये प्रतिकिलोमागे वाढले. यामुळे चांदी 65 हजार 814 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर वाढून 25.28 डॉलर प्रतिऔंस इतके झाले आहेत.

Share Market: सेन्सेक्सची 4 महिन्यातील सर्वात चांगली कामगिरी, निफ्टी 14500 च्या वर

आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा परिणाम भारतीय बाजारपेठेतही दिसून आला. जगभरात कोरोनामुळे अद्याप गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold rate today gold silver rates wednsday