esakal | सोन्याचे दर वाढले, चांदीसुद्धा झाली महाग
sakal

बोलून बातमी शोधा

gold rate today

गेल्या महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर आठवडाभर दरात चढ उतार होत होते.

सोन्याचे दर वाढले, चांदीसुद्धा झाली महाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - गेल्या महिन्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठल्यानंतर आठवडाभर दरात चढ उतार होत होते. त्यानंतर आता अमेरिकन डॉलर पुन्हा वधारल्यानं भारतीय रुपयाची किंमत कमी झाली. याचा परिणाम सराफ बाजारवर झाला असून सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. दिल्लीतील सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 122 रुपयांनी वाढ झाली. तर चांदीचा दरही 340 रुपयांना वाढला. दुसरीकडे जगभरात कोरोना व्हायरस वाढत असून अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष पेटला आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन या मोठ्या बाजारपेठांमध्ये मागणी कमी होत असल्यानं सोन्याच्या किंमती स्थिर राहतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

सोमवारी सोन्याचे दर 51 हजार 989 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके झाले होते.  त्यात मंगळवारी 122 रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 51 हजार 989 रुपये झाले.  चांदीच्या दरातही वाढ बघायला मिळाली. सोमवारी चांदीचा भाव 69 हजार 325 रुपये प्रतिकिलो इतकं होतं. त्यात 340 रुपयांची वाढ झाल्यानं चांदीचे दर मंगळवारी 69 हजार 665 रुपये इतके झाले. 

हे वाचा - सोने खरेदीसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय; फसवणुकीला बसणार आळा

गेल्या महिन्यात 7 ऑगस्टला सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत तब्बल 56 हजार 200 रुपयांवर पोहोचली होती. तेव्हापासून महिन्याभरात सोन्याच्या दरात 5 हजार 500 रुपयांची घसरण झाली. एकूण किंमतीच्या दहा टक्के इतकी दरात घट झाली. 

महिन्याभरात झालेल्या दरातील मोठ्या घसरणीनंतर डीलर्सकडून डिस्काउंट दिला जात आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये चढ उतार हे सुद्धा त्यामागचं कारण असावं. भारतात सोन्याच्या किंमतीमध्ये 12.5 टक्के आय़ात शुल्क आणि 3 टक्के जीएसटी शुल्क आकारलं जातं.