
जागतिक बाजारात तेजीमुळे सोमवारी दिल्लीतील सराफ बाजाराहीत सोने-चांदीचे दर वाढल्याचं दिसून आलं. ए
नवी दिल्ली - जागतिक बाजारात तेजीमुळे सोमवारी दिल्लीतील सराफ बाजाराहीत सोने-चांदीचे दर वाढल्याचं दिसून आलं. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे. सोन्यासह चांदीचे दरही आज वाढले. सलग दुसऱ्या वर्षी सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ बघायला मिळत आहे. यंदा वर्षभरात सोन्याचा दर तब्बल 28 टक्के वाढला आहे. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती दर्शवली आहे.
दिल्लीतील सराफ बाजारात सोमवारी सोने 185 रुपये प्रति दहा ग्रॅम महाग झालं. यामुळे सोन्याचा दर 49 हजार 757 रुपये इतका जाला. याआधी सोनं 9 हजार 572 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकं होतं. जागतिक बाजारात आज सोन्याचा दर 1885 डॉलर प्रति औंस इतका आहे.
हे वाचा - नव्या वर्षात सोन्याच्या किमती गाठू शकतात उच्चांक
सोन्यासह चांदीच्या दरातही आज वाढ झाली आहे. सोमवारी चांदीचा दर 1322 रुपये प्रतिकिलो वाढला. यामुळे एक किलो चांदीचा दर 68 हजार 156 रुपये इतका झाला. याआधी चांदीचा दर 66 हजार 834 रुपये इतका होता. तर जागतिक बाजारात आज चांदी 26.32 डॉलर प्रति औंस इतकी आहे.
हे वाचा - Gold Bonds: गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीची या वर्षातील शेवटची संधी
सोने-चांदीच्या वाढत्या दराबाबत माहिती देताना एडचीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ अॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितलं की, डॉलरचे मुल्य कमी झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं दिसत आहे. कोरोनाचा नवा प्रकार आढळल्यानं आणि लॉकडाऊनमुळे सोन्याचे दर वाढले आहेत.