सोनं अन् चांदी स्वस्त! होळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खुशखबर

तुम्हाला होळीच्या आधी सोने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी
Today's Gold Silver Price Updates
Today's Gold Silver Price Updatessakal media
Summary

तुम्हाला होळीच्या आधी सोने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी

जर तुम्हाला होळीच्या आधी सोने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या व्यापारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याबरोबरच चांदीच्या भावातही (Gold Silver Price) घसरण झाली. यासह सलग पाचव्या दिवशी सोने तसेच चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सोने 440 रुपयांनी तर चांदी 1214 रुपयांनी स्वस्त झाली. या घसरणीनंतर सोने 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 68 हजार रुपये प्रति किलोपर्यंत घसरले. (Today's Gold Silver Price Updates)

Today's Gold Silver Price Updates
ऐन लग्नसराईत सोने-चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या दर

मंगळवारी सलग पाचव्या दिवशी सोने-चांदी स्वस्त

या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सोन्याचा भाव 440 रुपये प्रति दहा ग्रॅम स्वस्त होऊन 51521 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. याआधी सोमवारी सोने 51,961 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदीचा भाव 1214 रुपयांनी स्वस्त होऊन 67,200 रुपये प्रति किलोवर बंद झाला. याआधी सोमवारी चांदी 68,414 प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली होती.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवा भाव

मंगळवारी 24 कॅरेट सोने 440 रुपयांनी स्वस्त होऊन 51521 रुपये, 23 कॅरेट सोने 438ने स्वस्त होऊन ते 51 हजार 315 रुपये, 22 कॅरेट सोने 403 ते 47 हजार 193 रुपये, 18 कॅरेट सोने 330 रुपयांनी स्वस्त होऊन 38 हजार 641 रुपये आणि 14 कॅरेट सोने 257 रुपयांनी स्वस्त होऊन 30 हजार 140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

Today's Gold Silver Price Updates
Gold Price : युद्धामुळे सोने-चांदीच्या किमतीत वाढ! जाणून घ्या नवे दर

अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता (How to Identify Purity of Gold)

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.

मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (Latest price of gold) जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Co ला भेट देऊ शकता.

हॉलमार्क (Hallmark) पाहूनच सोने खरेदी करा

सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवा. हॉलमार्क (Hallmark) पाहूनच सोन्याचे दागिने (Gold jewelry) खरेदी करावेत. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी आहे, जी हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com