लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Check Today's Gold Silver Price Updates
Check Today's Gold Silver Price Updatesesakal
Summary

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली.

लग्नसराईत सोने (Gold) खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर होण्याच्या एक दिवस आधी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Gold Silver Price) घसरण नोंदवली गेली. सलग तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदी स्वस्त झाली आहे. सोमवारी सोने प्रति दहा ग्रॅम 81 रुपयांनी स्वस्त होऊन 47834 रुपयांवर बंद झाले. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोने 47915 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदी 146 रुपयांनी स्वस्त होऊन 61074 रुपये प्रति किलोवर बंद झाली. याआधी शुक्रवारी चांदी 61220 प्रति किलोवर बंद झाली होती. (Check Today's Gold Silver Price Updates)

Check Today's Gold Silver Price Updates
Gold Rate Update : सोने-चांदीच्या किमतीत घसरण! जाणून घ्या नवीन दर

14 ते 24 कॅरेट सोन्याची नवीन किंमत

सोमवारी 24 कॅरेट सोने 47834 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 47642 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 43816 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 35876 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने सुमारे 12938 रुपये प्रति 10 ग्रॅम पातळीवर होते.

मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे सोन्याची नवीन किंमत (Latest price of gold) जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर (Retail rates) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासह, वारंवार अपडेट्सबद्दल माहितीसाठी तुम्ही www.Ibja.Co ला भेट देऊ शकता.

Check Today's Gold Silver Price Updates
Gold Rate : सोने तेजीत तर चांदी स्वस्त! जाणून घ्या आजचे नवे दर

हॉलमार्क (Hallmark) पाहूनच सोने खरेदी करा

सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवा. हॉलमार्क (Hallmark)पाहूनच सोन्याचे दागिने (Gold jewelry) खरेदी करावेत. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS)ही भारतातील एकमेव एजन्सी आहे, जी हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com