Gold Silver Rate: सोनं महागलं,चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचे दर

आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे, तर चांदीचे दर मात्र स्थिर राहिले आहे.
Gold silver rate
Gold silver rate Sakal

Gold Silver Price Today 11th April 2022: गेल्या दोन दिवसांपासून सोने तसेच चांदीचे दर स्थिर राहिल्यानंतर आज सोन्याच्या भावात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं १०० रुपयांनी महागलं आहे. आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 50,500 रुपये आहे. तर गेल्या सात दिवसांपासून चांदीचा भाव स्थिर आहे. चांदी अजूनही 71,000 रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत आहे. जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या गोंधळाचा भारतीय सराफा बाजारावरही परिणाम होत आहे. त्यामुळे 8 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. तेव्हापासून आजपर्यंत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे.

Gold silver rate
Gold-Silver Price: लग्नाच्या हंगामादरम्यान सोनं-चांदी महागलं; जाणून घ्या आजचे दर

सोन्या-चांदीचे आजचे भाव (11 एप्रिल)

सोने (22 कॅरेट): 50,500 (प्रति 10 ग्रॅम)

चांदी: 71,000 रुपये (प्रति किलो)


आठवड्याभरातील सोने आणि चांदीच्या दराचा आढावा-

04 एप्रिल (सोमवार): सोने 49,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम), चांदी 71,000 रुपये (प्रति किलो)

05 एप्रिल (मंगळवार): सोने 49,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम), चांदी 71,000 रुपये (प्रति किलो)

06 एप्रिल (बुधवार): सोने 49,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम), चांदी रुपये 71,000 (प्रति किलो)

07 एप्रिल (गुरुवार): सोने रु. 49,800 (प्रति 10 ग्रॅम), चांदी रु. 71,000 (प्रति किलो)

08 एप्रिल (शुक्रवार): सोने 50,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम), चांदी रुपये 71,000 (प्रति किलो)

09 एप्रिल (शनिवार): सोने 50,400 रुपये (प्रति 10 ग्रॅम), चांदी रुपये 71,000 (प्रति किलो)

10 एप्रिल (रविवार): सोने 50,400 रुपये (प्रति 10 ग्रॅम), चांदी रुपये 71,000 (प्रति किलो)

Gold silver rate
Gold Rate: लग्नाचा हंगाम सुरु होतोय; पहा आजचे सोन्याचे भाव

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com