Gold-Silver Price Today: चांदीने गाठला ७० हजारांचा टप्पा; सोन्याचा दर जाणून घ्या

आज एक किलो चांदीचा भाव 70 हजारांवर पोहोचला आहे.
gold price today silver rates
gold price today silver ratesesakal

Gold-Silver Price Today: सोन्याचे दरात सतत चढउतार होत असतात. आज म्हणजेच 15 एप्रिल रोजी देशात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,550 आहे, जी कालच्या दिवशी 49,350 होती. म्हणजेच 10 ग्रॅममागे 200 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत

देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 54,060 रुपये आहे. काल ही किंमत 53,840 रुपये होती. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

gold price today silver rates
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदार खूश

चांदीने गाठला 70 हजारांचा टप्पा-

चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 70,000 रुपये आहे. त्याच वेळी, काल ही किंमत 69,300 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे 700 रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

gold price today silver rates
Gold Price Today: तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com