ब्रेकिंग : सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे भाव

वृत्तसेवा
Thursday, 9 January 2020

  • सोन्याच्या किंमतीत 766 रुपयांची घसरण
  • चांदीसुद्धा 1,148 रुपयांनी गडगडली

पुणे : सोन्याच्या किंमतीत 766 रुपयांची मोठी घसरण होत सोने 40,634 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. डॉलरच्या तुलनेत मजबूत झालेला रुपया आणि जागतिक बाजारातील नकारात्मक ट्रेंड यांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोन्याबरोबरच चांदीची किंमतीसुद्धा गडगडल्या आहेत. चांदी 1,148 रुपयांनी घसरून 47,932 रुपये प्रति किलोवर आली आहे. याआधी बाजारात चांदी 49,080 रुपये प्रति किलो या पातळीवर होती. बुधवारी सोने 41,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती.

जेएनयू गर्ल्स हॉस्टेलवर सापडले कंडोम्स आणि सेक्स टॉइज? काय आहे सत्य?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी यामध्ये गुंतवणूकदारांनी सावधपणेच गुंतवणूक करताना दिसले. सोने 1,546 डॉलर प्रति औंस आणि चांदी 17.93 डॉलर प्रति औंस या पातळीवर व्यवहार करत होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीच्या किंमतीचा आणि मजबूत झालेल्या रुपयाचा परिणाम भारतातील सोन्याच्या किंमतीवरही झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 22 पैशांनी सुधारत रुपया 71.48 रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करत होता. दिवसअखेर रुपयाचे मूल्य 71.21 रुपये प्रति डॉलर इतके होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold silver prices back down as risk aversion recedes