esakal | सोन्याच्या आणि चांदीच्या भावात घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याच्या आणि चांदीच्या भावात घसरण

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटासंदर्भात परिस्थिती सुधारण्याची आशा वाटू लागल्याने इक्विटीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. त्याचा परिणाम होत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव ४७,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या खाली घसरला आहे.

सोन्याच्या आणि चांदीच्या भावात घसरण

sakal_logo
By
पीटीआय

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटासंदर्भात परिस्थिती सुधारण्याची आशा वाटू लागल्याने इक्विटीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. त्याचा परिणाम होत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव ४७,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या खाली घसरला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तर चांदीचा भावातसुद्धा मोठी घसरण नोंदवण्यात आली. मल्टी कमॉडिटी बाजारात (एमसीएक्स) सोन्याचा भाव  46,725 रुपये प्रति १० ग्रॅम पर्यत खाली आला आहे. तर चांदीचा भावदेखील घसरण होत 48,120 रुपये प्रति किलोवर आला आहे. 

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

मागील काही दिवसांपासून सातत्याने तेजीत असलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या भावांना ब्रेक लागला आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय घटकांचा परिणाम सोन्याच्या तेजीला अटकाव होण्यात झाला आहे.

सोन्याच्या भावात आज जवळपास ०.५ टक्क्यांची घसरण झाली आहे तर चांदीच्या भावात जवळपास १.५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

अमेरिकेचा मोठा निर्णय : ८०० चीनी कंपन्या अमेरिकन शेअर बाजाराबाहेर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,७५० डॉलर प्रति ट्रॉय औंस  आणि चांदीचा भाव १८ डॉलर प्रति ट्रॉय औंस इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सुधारणा झाल्याचा परिणामसुद्धा सोन्याच्या आणि चांदीच्या भावावर झाला आहे. 

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. प्रचंड अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार सुरू आहे.  अमेरिका-चीनमध्ये व्यापारी संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. नजीकच्या काळात व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचाही परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे.

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले

सोने 50 हजारांवर जाण्याची शक्यता
दरम्यान सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. वर्ष 2008 मध्ये देखील आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेत सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला होता. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आज जरी सोन्याच्या भावात घसरण नोंदवण्यात आली असली तरी नजीकच्या काळात सोने 50 हजार रुपयांचा भाव  गाठण्याची शक्यता आहे.

* कमॉडिटी बाजारात मौल्यवान धातूंमध्ये घसरण
* सोने आणि चांदीच्या भावात घसरण
* नजीकच्या काळात व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता