Gold silver rate : जपान-अमेरिका यांच्या रणनितीचा देशातील सोने-चांदी दरावर होणार परिणाम

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 8 December 2020

आंतरराष्ट्रीय बाजारातील या  घडामोडींमुळे  सोने-चांदी बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.  

Gold silver rate today 8 December 2020: सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी तोलामोलाचे वातावरण दिसले. स्थानिक बाजारात  सोन्याला भाव मिळाला तर चांदीच्या दरात थोड्याप्रमाणात मंदी पाहायला मिळाली. अमेरिका आणि जपानच्या सरकारच्या पॅकेजचा सोने-चांदी भाव वाढीवर परिणाम दिसत असून दर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

अमेरिकन सीनेटमध्ये डेमोक्रेटिकचे नेते चक शूमर यांनी मदत निधी विधेयकावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली. दुसरीकडे जपान सरकारनेही 108 अरब डॉलरचे पॅकेज जाहीर करण्याची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या  घडामोडींमुळे  सोने-चांदी बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.  

सौदी अरेबियात ब्रिटिश सैनिक का आहेत तैनात? कोणत्या संकटाला घाबरलेत प्रिंस सलमान

मंगळवारी एमसीएक्समध्ये गोल्ड फ्यूचर्स 144 रुपये  म्हणजे 0.29 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे सोन्याचा दर 50,090 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. सिल्वर फ्यूचर्स 92 रुपये म्हणजेच 0.14 टक्के घट झाल्याचे पाहायला मिळाले. चांदीचा दर 65,704 रुपये प्रति किलो ग्रॅमवर इतका होता.  दिल्ली सराफ बाजारात सोमवारी सोन्यात 104 रुपयांनी घट झाली होती. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 48,703 रुपये इतके होते.  

महागाईमुळे उज्ज्वला योजनेकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; दर वाढताच गॅसचे बूकिंग घटले

परदेशी बाजारात मंगळवारी सोन्याच्या व्यापारात स्थिरता असल्याचे पाहायला मिळाले. सोन्याचे उच्चांकी भाव कायम राहिले. अमेरिकेत कोरोनाचा आकडा कमी होण्याचे नाव होताना दिसत नाही. परिणामी याठिकाणी पुन्हा काही गोष्टींवर निर्बंध येण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी बाजारात स्पॉट गोल्डमध्ये थोडा फार बदल दिसला. सोमवारी सोन्याचे दर 1863.30 डॉलर प्रति औंस होते. मंगळवारी यात 1.7 टक्के वाढ होऊन हा दर 1865.25 डॉलर प्रति औंस वर पोहचला.  यूएस गोल्ड फ्यूचर्समध्ये 0.1 टक्के वाढीसह 1,867.70 डॉलर प्रति औंस इतका होता. चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीय. या ठिकाणी चांदीचा दर 24.51 डॉलर प्रति औंस इतका होता.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold silver rate today 8 December 2020