आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं घसरलं; भारतातही होऊ शकतो परिणाम

टीम ई-सकाळ
Thursday, 20 August 2020

सध्या सर्वत्र सोन्याची चर्चा होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोन्यात आता गुंतवणूक करावी की नाही, हा प्रश्‍न अनेकांना पडत आहे. सोने आधुनिक भाषेत कमॉडिटी असले तरी, सोने सर्वकालीन महत्त्वाचे आहे.

Gold Silver Rates today : आंतरराष्ट्रीय Internation Gold Market सोन्याच्या किंमतीत कालपासून मोठी घट झालेली आहे. यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्वने काल अमेरिकेतील कंपन्यांचा मागील 3 महिन्यांचा आढावा काल जाहीर केला. यात आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे भाव 3 टक्क्यांनी उतरल्याचे स्पष्ट होत आहे. यादरम्यान डॉलरही मजबूत होत आहे, हे देखील एक कारण सोन्याचे भाव कमी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. परिणामी म्हणजे आज भारतीय बाजारात देखील सोन्याचे भाव उतरू शकतात, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्या येत असलेल्या कोरोनाच्या लशीबद्दलच्या  सकारात्मक बातम्यांमुळे पुढील काही दिवसांत सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतील, असे मत बँक ऑफ अमेरिकाच्या फंड मॅनेजरने केलं आहे. 

बाजारपेठेविषयी इतर घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्याच्या दराचा आपण इतिहास पाहिला तर, सोने नेहमी जागतिक संकटाच्या वेळेस महागलं आहे. यामध्ये मग 70 च्या दशकांतील जागतिक युध्दपरिस्थिती असेल किंवा अरब युध्दाचा प्रसंग असो, याकाळात सोने मोठ्या प्रमाणात महागले होते. सध्या कोरोनामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी अस्थिरता दिसत आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीच बाजारात सोन्याचे दर 2500 हजार डॉलरपर्यंत जातील, असं तज्ञांनी सांगितलं आहे. 

गुंतवणूक करावी की नाही?
सध्या सर्वत्र सोन्याची चर्चा होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोन्यात आता गुंतवणूक करावी की नाही, हा प्रश्‍न अनेकांना पडत आहे. सोने आधुनिक भाषेत कमॉडिटी असले तरी, सोने सर्वकालीन महत्त्वाचे आहे. कारण सोन्याएवढे शाश्वत मूल्य अन्य कोणत्याही गुंतवणूक पर्यायांत नाही. सोने हे चलनाप्रमाणे मूल्यवान आहे. त्यामुळे काळाच्या ओघात गुंतवणुकीचे नवे पर्याय आले असले तरी, आधुनिक काळातही जोखीम संरक्षणासाठी सोन्यातील गुंतवणुकीस प्राधान्य दिले जायला हवे.

आणखी वाचा - चर्चा चकाकत्या सोन्याची!

जाणून घ्या सध्याचे दर
कालचे दिल्लीतील सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54 हजार 269 तर मुंबईत 53 हजार 424 रुपये इतकी झाली होती.  तर चांदीच्या Silver Rates दरातही मोठी घसरण झाली होती. दिल्लीत एक किलो चांदीचे दर 72 हजार 562 वरून 69 हजार 450 रुपयांवर आले होते. चांदीचे दर 3 हजार 112 रुपयांनी कमी झाले होते. मुंबईत चांदीचा दर 67 हजार 135 रुपये प्रति एक किलो इतका आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold silver rates today india international market impact