ई-कॉमर्सवर सोने झळाळणार 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

मुंबई - मुहूर्ताला सराफ पेढींवर जाऊन सोने खरेदी करण्याच्या परंपरेला यंदा छेद मिळण्याची शक्‍यता आहे. सदा सर्वकाळ सवलतींची खैरात करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी अक्षय तृतीयेनिमित्त ज्वेलरी आणि सोन्याच्या खरेदीवर जाहीर केलेल्या सवलती ग्राहकांना खुणावत आहेत. या सवलतींच्या वर्षावात यंदा ई-कॉमर्सवरून विक्रमी सोने विक्री होण्याची या कंपन्यांची अपेक्षा आहे.

सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाण्यांच्या खरेदीवर पाच ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत सवलत, घडणावळीवर घसघशीत सवलत, फ्री गोल्ड कॉइन, गिफ्ट कार्ड, लकी ड्रॉमधून कोट्यवधींच्या बक्षिसांची खैरात करून ई-कॉमर्स कंपन्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, होमशॉप १८, ब्लूस्टोन, मिंत्रा, शॉपर्स स्टॉप आदी ई-कॉमर्स मंचावर सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळींवर ५० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत भरघोस सवलत देण्यात आली आहे. तनिष्क, मलाबार, जॉयअलुक्कास, पी. एन. गाडगीळ, वामन हरी पेठे यांसारख्या बड्या ज्वेलर्सनेही ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत. त्यात घडणावळीवर २५ ते ५० टक्‍के सूट, एक्‍स्चेंजवर १०० टक्के परतावा, घरपोच सेवा, रिटर्न पॉलिसीचा समावेश आहे.

Web Title: Gold will rise on e-commerce