विमानप्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

नवी दिल्ली: जर तुम्ही दिल्लीहून विमानाने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नागरी उड्डाण नियामक मंडळाने युझर डेव्हलपमेंट फी(युडीएफ) कमी केली आहे. यापुढे, परदेशातून किंवा देशातील इतर ठिकाणांहून दिल्ली विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना कोणतेही युडीएफ शुल्क आकारले जाणार नाही.

तसेच, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन देशात कुठेही प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता युडीएफपोटी अवघे 10 रुपये भरावे लागतील. याआधी ही रक्कम 275-550 रुपयेएवढी होती. त्याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हे शुल्क 635-1,270 रुपयांवरुन अवघे 45 रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी बचत होणार आहे. 

विमानतळांचे नियमन करणाऱ्या मंडळाने यासंदर्भात दोन वर्षांपुर्वी आदेश दिले होते. कारण, विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीने या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. कंपनीने एअरपोर्ट शुल्क 42.6 टक्क्यांनी वाढविण्याची मागणी केली होती.  

Web Title: Good news for the air traveler

टॅग्स