esakal | मोदी सरकार आणि सामान्यांसाठी खूशखबर, देशाच्या अर्थचक्राला येतेय गती
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Economy recovering

मागील महिन्यापासून देशातील अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे काही संकेत आले आहेत.

मोदी सरकार आणि सामान्यांसाठी खूशखबर, देशाच्या अर्थचक्राला येतेय गती

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

नवी दिल्ली: 2020 हे वर्ष जगासाठी मोठं संकटांचं ठरलं आहे. यात मुख्य संकट होतं ते कोरोनाचं. चीनमधून सुरु झालेला कोरोनाचा प्रसार आज जगभर पसरला आहे. युरोप खंडातील काही देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरं जात आहेत. त्यामुळे युरोपात मोठी मंदीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जगातील बऱ्याच प्रगत देशांचा व्यवहार युरोपियन युनियनमधील देशांशी आहे. त्यामुळे जगभरात आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दुसरी आर्थिक मंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीच्या शेवटी आढळला होता. सुरुवातीला भारतीयांनी नेहमीसारखं कोरोनाला गांभीर्याने घेतलं नाही. त्याचा परिणाम देशभर दिसून आला. सगळे व्यवहार, उद्योगधंदे, आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत व्यापार आणि सेवा क्षेत्रही ठप्प पडले होते. मागील तिमाहीतील देशाचा GDP शून्याच्या खाली जवळपास -24 पर्यंत गेला होता. लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्थेचे चक्र थांबल्याने लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. बेरोजगार आणि बेकारीचे प्रमाण वाढले. काही शहरांत गुन्हेगारीची टक्केवारीही वाढताना दिसला आहे. पण मागील महिन्यापासून देशातील अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे काही संकेत आले आहेत.

मारुती सुझुकीची ऑक्टोबरमध्येच दिवाळी!

अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे संकेत

1. कोरोनाचा प्रभाव ओसरतोय-
अशात दिलासादायक बाब म्हणजे आता देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कमी होणारा कोरोनाचा प्रभाव अर्थव्यवस्थेच्या चक्राला चालना देण्यास फायदेशीर ठरत आहे. सध्या देशात प्रतिदिन कोरोनाचे 50 हजारांच्या आत रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा प्रसार आणि प्रभाव उतरत असल्याचे संकेत अर्थव्यवस्थेला मोठी गती देतील, अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

2. जीएसटीची 1 लाख कोटींच्या वर-
रविवारी अर्थ मंत्रालयाने एक चांगली बातमी दिली आहे. रविवारी जाहीर झालेल्या जीएसटीची आकडेवारी दिलासा देणारी आहे. ऑक्टोबर महिन्यात जवळपास 1 लाख 5 हजार कोटी GSTची वसुली करण्यात आली आहे. ही जीएसटीची वसूली तब्बल 8 महिन्यानंतर सर्वाधिक ठरली आहे. 

ITR भरण्याची मुदत वाढली, पण चुकूनही करु नका उशीर नाहीतर...

सरकारला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मिळालेल्या महसूलाच्या तुलनेत यंदाचे प्रमाण दहा टक्क्यांनी अधिक आहे. आर्थिक अडचणीमुळे जीएसटी भरपाईसाठी राज्यांनी केंद्राकडे लावलेला तगादा आणि या अर्थसहाय्यासाठी केंद्राने कर्जउभारणीची केलेली तयारी या पार्श्वभूमीवर जीएसटी वसुली लाखावर पोहोचल्याने सरकारच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोरोनामुळे लॉकडाउन लागू केल्यानंतर सरकारचा महसूल घटला होता. 

3. उद्योगधंदे स्थिरावत आहेत- 
देशातील उद्योगधंदे पूर्वपदावर येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियासाठी (MSI) 2020 चा ऑक्टोबर महिना चांगला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील कंपनीच्या कारच्या विक्रींचा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी तर सप्टेंबरच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढला आहे. 

4. व्याजदरात कपात-
मागील 9 महिन्यांपासून कोरोनाच्या प्रभावामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठी बिकट झाली होती. अशात आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बऱ्याच बॅंका व्याज दर कमी करत आहेत. सरकारही याच्यासाठी उपाययोजना करत आहे. भारतातील बॅंक ऑफ बडोदा जी सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक आहे तिने रेपो दरावर आधारित कर्जावरील व्याजदारातील (Baroda Repo Linked Lending Rate) 0.15 टक्क्यांची कपात शनिवारी जाहीर केली आहे. यामुळेच आता गृहकर्जांसाठी असणारं व्याज दर 6.85 टक्के राहणार आहे. हे नवीन नियम बॅंक 1 नोव्हेंबरपासून लागू करत आहे. 

5.ICICI बँकेच्या कमाईत 6 पट वाढ-
कोरोना काळातही आयसीआयसीआय बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे. बँकेने जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. नेट प्रॉफिटमध्ये वार्षिक निव्वळ नफ्यात सहापट वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये बँकेला 4251 कोटींचा फायदा झाला आहे. 2019 च्या सप्टेंबरमधील तिमाहीत बँकेला 655 कोटींचा लाभ झाला होता.

loading image