esakal | Share Market : फिलिप्स कार्बन, गोदरेज इंडस्ट्रीज, जेबीसारख्या स्टॉक्समधून मिळेल चांगला परतावा
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

फिलीप्स कार्बन, गोदरेज इंडस्ट्रीज, जेबीसारख्या स्टॉक्समधून मिळेल चांगला परतावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-- शिल्पा गुजर

शेअर बाजारात तेजी कायम आहे. गेल्या काही महिन्यांपासून निफ्टी उच्चांक गाठत आहे. निर्देशांक 20 आणि 50 दिवसांच्या एक्सपोनेंशियल मुव्हींग एव्हरेजवर (EMA) व्यापार करत असून हे तेजी कायम राहण्याचे संकेत आहेत. 14 महिन्यांचे RSI 80 वर आहे जे जास्त खरेदी दाखवत नाही. येत्या आठवड्यात बाजारात वाढ सुरू राहू शकते असाही अंदाज आहे. निफ्टीचे पुढील लक्ष्य 18,200 आणि 18,450 पॉईंटवर आहेत.

हेही वाचा: RIL ने मोडले सर्व रेकॉर्ड्स, ठरली देशातील नंबर 1 कंपनी

पुढील स्टॉक्स 2-3 आठवड्यांत देऊ शकतात चांगला परतावा

 • फिलिप्स कार्बन ब्लॅक (Phillips Carbon Black)

  LTP: 268.45 रुपये,

  टारगेट : 300 रुपये,

  स्टॉप लॉसः 250 रुपये,

  वाढ : 12 टक्के

  डेली चार्टवर या शेअरने अधिक व्हॉल्यूमसह डाउनवर्ड स्लोपिंग ट्रेंडलाइन मोडली आहे आणि 3 ऑगस्टपासून वाढीसह बंद झाली आहे. यासाठी शॉर्ट टर्म ट्रेंड सकारात्मक आहे, ज्यात तो सर्व महत्वाच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेडिंग करत आहे.

हेही वाचा: 'या' 4 स्पेशॅलिटी केमिकल्स स्टॉक्सना कोटक सिक्युरिटीजकडून खरेदी रेटिंग

 • जेबी केमिकल्स (JB Chemicals) -

  LTP: 1,869.70 रुपये,

  टारगेट : 2,100 रुपये,

  स्टॉप लॉसः 1,750 रुपये,

  वाढ : 12 टक्के

  या शेअरने डाउनवर्ड स्लोपिंग ट्रेंडलाइन मोडली आहे. हा स्टॉकही चांगला परफॉर्म करत आहे. 20, 50 आणि 100-दिवसांच्या EMA च्या वर व्यवहार करत आहे. RSI आणि MFI लाईनने ट्रेंडलाइन ब्रेकआउट दिली आहे, याचा अर्थ हा स्टॉक अल्पावधीसाठी म्हणजेच शॉर्ट टर्ममध्ये तेजीचे संकेत संकेत देत आहे.

हेही वाचा: Petrol, Diesel Price: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, जाणून घ्या दर

 • गोदरेज इंडस्ट्रीज (Godrej Industries)

  LTP: 577.45 रुपये

  टार्गेट : 640 रुपये

  स्टॉप लॉसः 538 रुपये

  वाढ : 11 टक्के

  या शेअरने 100 दिवसांच्या EMA मध्ये अनेकदा सपोर्ट घेतल्यानंतर आता तेजीचे संकेत देत आहे. हे सकारात्मक ट्रेंडिंग आहे. सोबतच हे शेअर्स 50, 100 आणि 200 दिवसांच्या EMA च्या वर व्यापार करत आहे. त्याच्या डेली RSI ने एक ट्रेंड लाइन ब्रेकआउट दाखवत आहे, जो अल्पावधीत म्हणजेच शॉर्ट टर्ममध्ये चांगल्या हालचाली दाखवत आहे. गेल्या काही महिन्यांत यात खरेदी वाढली आहे.

(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा)

loading image
go to top