गुगल करणार व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणूक?; आयडियाकडून वृत्ताचे खंडन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 मे 2020

फेसबुकने नुकतीच रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला जाहीर केला आहे.आता गुगलने देखील व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणूक करण्यास रस दाखवला आहे.गुगल५टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - गुगल भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त आहे.  फेसबुकने नुकतीच रिलायन्स जिओमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला जाहीर केला आहे. आता गुगलने देखील व्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणूक करण्यास रस दाखवला आहे. मात्र आयडिया कंपनीने अशाप्रकारे गुंतवणुकीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, एजीआरच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन- आयडियामध्ये गुगल गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, गुगल ५ टक्के हिस्सा खरेदी करण्याची शक्यता आहे.

गुगलची पॅरेंट कंपनी असलेली अल्फाबेट ही जिओमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे देखील वृत्त विविध अहवालातून समोर येत आहे. 

स्पेक्ट्रम लिलावामुळे दूरसंचार क्षेत्रावरील कर्ज वाढण्याची शक्यता

व्होडाफोन- आयडियाकडून खंडन 
व्होडाफोन- आयडियामध्ये परदेशी कंपनीकडून गुंतवणुकीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कंपनी शेअरधारकांच्या आणि कंपनीच्या हितासाठी कायम चांगल्या संधीचा शोध घेत असते. यामुळे अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आल्यास त्यावर कंपनीचे संचालक मंडळ नक्की विचार करेल.

एअर इंडिया कर्मचारी संघटनांनी मागितले ५०,००० कोटींचे आर्थिक पॅकेज

व्होडाफोन- आयडियाचा शेअर तेजीत
गुगल कंपनीमध्ये गुंतवणूक करणार या वृत्ताने शुक्रवारी व्होडाफोन-आयडियाचा शेअर इंट्राडे व्यवहारात १५ टक्क्यांनी वधारला होता. दिवसअखेर १२.९३ टक्क्यांनी वधारून ६.५५ रुपयांवर स्थिरावला.

श्रीमंत व्हायचंय, मग लक्षात घ्या 'हे' ७ अर्थमंत्र...

व्होडाफोन- आयडियासमोर अडचणींचा डोंगर 
 दूरसंचार विभागाने व्होडाफोन-आयडियाला एकूण समायोजित महसुलापोटी  (एजीआर) ५८ हजार कोटी रूपयांची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी कंपनीने 6 हजार 854 कोटी रूपयांच्या रकमेचा भरणा केला होता. २०१८ मध्ये ब्रिटनमधील  व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समुहाची आयडिया या कंपन्या एकत्र आल्या होत्या. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर व्होडाफोन-आयडिया असे नामकरण करण्यात आले आहे. सध्या आयडियामध्ये व्होडाफोनची ४५ टक्के हिस्सेदारी आहे.

आरबीआय बाॅंड्समध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची संधी...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google to invest in vodafone idea, idea denies the news