जीएसटीमुळे सरकार 'मालामाल' ; एक लाख कोटींचा महसूल जमा

Government Earn One Lakh Crore Revenue in the Form of GST says Arun Jaitey
Government Earn One Lakh Crore Revenue in the Form of GST says Arun Jaitey

नवी दिल्ली : ''वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून ऑक्टोबर 2018 पर्यंत एक लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एवढा मोठा महसूल मिळण्याचे कारण म्हणजे कर्जाच्या दरांमध्ये कपात, कर चोरीवर लगाम आणणे, ही मुख्य कारणं आहेत'', असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटवरवरून आज (गुरुवार) दिली. 

देशभरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारला जात आहे. या जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा महसूल जमा झाला आहे. याबाबत जेटलींनी ट्विट करुन सांगितले, की ''कर्जाच्या दरांमध्ये करण्यात आलेली कपात, कर चोरीवर लावण्यात आलेला लगाम यांसारखी महत्वाची कारणे मोठा महसूल मिळण्यामागची आहेत. या सकारात्मक उपाययोजनांमुळे याचा फायदा सरकारला मिळाला आहे''. 

दरम्यान, यापूर्वी ऑगस्टमधील जीएसटीची मिळकत 99, 690 कोटी रुपये इतकी होती. आता यामध्ये वाढ झाली असून, हा आकडा एक लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com