रक्कम तेवढीच परतावा कमी; सरकाने 10 वर्षात PF च्या व्याजात केली मोठी कपात PPF Interest Rates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala sitharaman

रक्कम तेवढीच परतावा कमी; सरकाने 10 वर्षात PF च्या व्याजात केली मोठी कपात

गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून पब्लिक प्रॉव्हिडंड फंड (PPF) कडे पाहिलं जातं. पैसे परत मिळण्यासाठी केंद्र सरकारची हमी असल्याने गुंतवणूक पर्यायांमधील हा सगळ्यात सुरक्षित पर्याय मानला जातो. मात्र, 2013 पासून पीपीएफचा व्याजदर सातत्याने घसरत आहे. तर 2014 मध्ये, PPF गुंतवणुकीची मर्यादा प्रति वर्ष 1 लाख रुपयांवरून 1.5 लाख रुपये प्रति वर्ष करण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार, PPF वरील व्याज 2013 ते 2022 पर्यंत 8.8 टक्क्यांवरून 1.7 टक्क्यांनी कमी करून 7.1 टक्क्यांवर आले आहे.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

वित्त मंत्रालय PPF व्याज दरात तिमाही आधारावर बदल करते. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पुढील तिमाहीसाठीचे व्याज दर डिसेंबर 2022 च्या अखेरीस जाहीर केले जातील. गेल्या 10 वर्षांत PPF व्याजदरात कसा बदल झाला आहे ते वाचा.

2014 मध्ये PPF व्याज दर :

01.04.2013 ते 31.03.2014 दरम्यान PPF व्याजदर 8.7% आणि गुंतवणुकीची मर्यादा रु. 1 लाख/वर्ष होती. 01.04.2014 ते 31.03.2016 दरम्यान PPF व्याजदर 8.7% आणि गुंतवणूक मर्यादा रु. 1.5 लाख/वर्ष होती.

2015 आणि 2016 मध्ये PPF व्याजदर :

PPF व्याजदर 01.04.2016 ते 30.09.2016 दरम्यान 8.1% पर्यंत सुधारित करण्यात आला, तर गुंतवणूक मर्यादा रु. 1.5 लाख प्रतिवर्ष होती.

2017 मध्ये PPF व्याज दर :

PPF व्याज दर 01.10.2016 ते 31.03.2017 दरम्यान आणखी 8% पर्यंत कमी करण्यात आला आणि गुंतवणूक मर्यादा रु. 1.5 लाख/वर्ष होती. 01.04.2017 ते 30.06.2017 दरम्यान PPF व्याज दर 7.9% करण्यात आले. 01.07.2017 ते 30.09.2017 दरम्यान, PPF व्याज दर 7.8% करण्यात आले.

2018 मध्ये PPF व्याज दर :

PPF व्याज दर 01.01.2018 ते 30.09.2018 दरम्यान 7.6% पर्यंत कमी करण्यात आले आणि गुंतवणूक मर्यादा रु. 1.5 लाख/वर्ष होती.

2019 मध्ये PPF व्याज दर :

PPF व्याजदर 01.10.2018 ते 30.06.2019 दरम्यान 8% पर्यंत वाढवण्यात आले आहे आणि गुंतवणूक मर्यादा रु. 1.5 लाख/वर्ष होती.

2020 मध्ये PPF व्याज दर :

PPF व्याजदर 01.07.2019 ते 31.03.2020 दरम्यान 7.9% पर्यंत कमी करण्यात आले आणि गुंतवणूक मर्यादा रु. 1.5 लाख/वर्ष होती.

2021 आणि 2022 मध्ये PPF व्याजदर :

PPF वरील व्याज दर 01.04.2020 पासून 7.1% राहील आणि गुंतवणुकीची मर्यादा रु. 1.5 लाख/वर्ष आहे