'प्रधानमंत्री आवास योजने' चा कालावधी आणखी दोन वर्षे वाढणार? |PM Awas Yojana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'प्रधानमंत्री आवास योजना'

'प्रधानमंत्री आवास योजने'चा कालावधी आणखी दोन वर्षे वाढणार?

भारतातील गृहनिर्माण समस्या सोडवण्यासाठी सरकार कडून प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana scheme) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे मुख्य उद्दीष्टे आहे.

आता सरकारने प्रधानमंत्री आवास योजना चा मुळ कालावधी वाढवत ग्रामीण भागात ही योजना मार्च 2024 पर्यंत वाढवण्याची तयारी दाखवली आहे. मंजूर घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सरकारने ही योजना वाढवण्याच्या तयारीत आहे. (government is all set to extend pm awas yojana scheme till march 2024)

हेही वाचा: कोणत्याही भारतीय कार्डने पेमेंट होणार नाही; Apple चा मोठा निर्णय

शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली होती. सरकारने सुरुवातीला मार्च 2022 ही या योजनेची अंतिम मुदत ठेवली होती. परंतु अनेक राज्यांकडून या योजनेची मुदतवाढ करण्यासाठी मागणी वाढली.

या मागणीमुळे अनेक घरांना मंजुरी मिळाल्याने बांधकाम पूर्ण होण्यास आता अधिक वेळ लागणार आहे, त्यामुळे आता या योजनेची मुदतवाढ मार्च 2024 पर्यंत वाढवण्याचा विचार सुरु आहे.

हेही वाचा: रेशनकार्डधारकांसाठी सरकारची नवी नियमावली; नियम न पाळल्यास जावं लागेल तुरुंगात

केंद्राने आतापर्यंत या योजनेंतर्गत जवळपास 1.23 कोटी घरांना मंजुरी दिली तर त्यापैकी जवळपास 98.4 लाख घरांचे बांधकाम सुरू झाले. सरकारी आकडेवारीनुसार, जवळपास 58.7 लाख घरे या योजनेअंतर्गत बांधण्यात आली आहे.

Web Title: Government Is All Set To Extend Pm Awas Yojana Scheme Till March 2024

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top