
रेशनकार्डधारकांसाठी सरकारची नवी नियमावली; नियम न पाळल्यास जावं लागेल तुरुंगात
जर तुम्ही राशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खरे तर अलीकडेच सरकारने रेशनकार्ड धारकासंदर्भात नवे नियम लागू केले आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला मिळणारे मोफत रेशन बंद होऊ शकते. सरकार गव्हासाठी २७ रुपये दंड आकारेल आणि हा दंड तुम्ही रेशन घेण्यास सुरुवात केल्यापासून लागू केला जाईल. एवढेच नाही तर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकते. ( The government has made new rules regarding the ration card.)
हेही वाचा: WhatsApp यूजर्ससाठी आजपासून नवीन फीचर; Mark Zuckerberg म्हणाले..
जर तुम्ही दारिद्र्यरेषेच्या खाली येत नसाल, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणार, घरात सर्व सुखसोयी असतानाही तुम्ही राशन घेत असाल.कुटुंबाचे मासिक उत्पन्न 3000 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास, APL साठी, कुटुंबाचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी रेशनकार्ड असल्यास, तुम्ही ताबडतोब रेशनकार्ड सरेंडर करा.
भारत सरकारने कोरोनाच्या काळात गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना मोफत रेशन देण्याची व्यवस्था सुरू केली होती. ही व्यवस्था अजूनही सुरू आहे. मात्र अलीकडेच सरकारने काही अटींसह नवा नियम लागू केला असून त्यात रेशन कार्ड सरेंडर करण्यास सांगितले आहे. तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास, तुमचे नुकसान होऊ शकते एवढेच नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाईही देखील होऊ शकते.
हेही वाचा: Share Market: शेअर बाजार कोसळला; निफ्टी-50 मधील सर्व शेअर्समध्ये घसरण
अलीकडे पात्र नसलेले अनेक लोक राशन घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले त्यामुळे या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आता अपात्रांना तात्काळ रेशनकार्ड सरेंडर करण्याची मागणी शासनाकडून करण्यात येत आहे. जर कोणी रेशनकार्ड जमा न केल्यास त्याच्यावर चौकशीअंती कायदेशीर कारवाई केली जाईल.
Web Title: Government Has Made New Rules Regarding The Ration Card Check Here
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..