काळ्या पैशाविरोधात 38 हजार ई-मेल

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

'सीबीडीटी'ची माहिती; केवळ 16 टक्के ई-मेलची पुढील तपासणी 

मुंबई: काळा पैसाधारकांची माहिती देण्यासाठी प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या ई-मेल आयडीवर 38 हजार ई-मेल आले आहेत. यातील 16 टक्के ई-मेल आणखी तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) माहिती अधिकारांतर्गत दिली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती मागविली होती. प्राप्तिकर विभागाने blackmoneyinfo@incometax.gov.in हा ई-मेल आयडी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुरू केला होता. काळा पैसाधारकांची माहिती नागरिकांनी कळवावी या हेतूने हा ई-मेल आयडी जाहीर केला होता. "सीबीडीटी'कडे 7 एप्रिलपर्यंत याबाबतचे 38 हजार 68 ई-मेल आले आहेत. यातील 6 हजार 50 म्हणजेच केवळ 16 टक्के ई-मेल आणखी तपासासाठी संबंधित प्राप्तिकर महासंचालकांकडे (तपास) पाठविण्यात आले आहेत. उरलेल्या 32 हजार 18 ई-मेलवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

याविषयी बोलताना घाडगे म्हणाले, की "सीबीडीटी'कडे आलेल्या ई-मेलपैकी 84 टक्के ई-मेल कोणत्याही चौकशीविना बंद करण्यात आले. यातून असे स्पष्ट होते, की हे ई-मेल फसवे होते अथवा अधिकाऱ्यांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही. तसेच, या ई-मेलची तपासणी करण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्याचेही कारण असू शकते.

जमा जुन्या नोटांची माहिती नाही
घाडगे यांनी नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटांची माहिती रिझर्व्ह बॅंकेकडे माहिती अधिकारांतर्गत मागविली होती. रिझर्व्ह बॅंकेने माहिती अधिकार कायद्यातून मुभा असल्याचे कारण देत माहिती देण्यास नकार दिला होता.

Web Title: Government receives 4,000 emails on black money in 72 hours