सरकारी बँका, LIC नंतर आता मुंबई विमानतळ विकणार; केंद्राचा खासगीकरणाचा सपाटा

airport
airport
Updated on

नवी दिल्ली- केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई, बेंगळुरु आणि हैदराबाद विमानतळांचे भागभांडवल विकण्याची योजना तयार केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने संपत्तीची विक्री करुन 2.5 लाख कोटी रुपये जमा करण्याची योजना बनवली आहे. तसेच सरकार या विमानतळातील आपला भाग विकण्याचा तयारीत आहे. हे विमानतळ आधीपासूनच खासगी मालकीचे आहेत. पण, विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकारची काही भागीदारी अजून शिल्लक आहे. मागील महिन्यात सचिव अधिकारी समितीमध्ये झालेल्या चर्चेत, या चार विमानतळांचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या उर्वरित भागिदारीसह अन्य 13 विमानतळांच्या खासगीकरणाची तयारी सुरु आहे. नागरी उड्डान मंत्रालय दिल्ली, मुंबई, बेंगळुरु आणि हैदराबाद या विमानतळांचे भागभांडवल विकण्यासाठी अपेक्षित मंजुरी मिळवणार आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाला येत्या काही दिवसामध्ये मंत्रीमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवले जाण्याची शक्यता आहे. खासगीकरणासाठी निश्चित करण्यात आलेले 13 विमानतळांच्या प्रस्तावाला अधिक आकर्षक करण्यासाठी फायद्याचे आणि बिगर-फायद्याचे अशा विमानतळांसाठी पॅकेज तयार केले जाणार आहे. 

मोदी सरकारच्या विमानतळांच्या खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अडाणी समूहाने मागील वर्षी सह विमानतळ 'लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, मंगळुरु, तिरुवनंतपुरम आणि गुवाहाटी' यांना चालवण्याचे लायसेन्स मिळवले आहे. 

नागरी उड्डान मंत्रालयाअंतर्गत काम करणारी एएआय देशभरातील 100 पेक्षाअधिक विमानतळांची मालक आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये अडाणी समूहाची 74 टक्के मालकी आहे. उर्वरित 26 टक्के मालकी एएआयकडे आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये जीएमआर समूहाजवळ 54 टक्के, भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे 26 टक्के आणि एरमान मलेशियाजवळ 10 टक्के मालकी आहे. एएआयजवळ आंध्र प्रदेश सरकारसोबत हैदराबाद आंतररष्ट्रीय विमानतळ लिमिटेडमध्ये 26 टक्के आणि कर्नाटक सरकारसोबत बेंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 26 टक्के भागिदारी आहे.

दरम्यान, मोदी सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. सरकार मालकीच्या असणाऱ्या अनेक कंपन्यांतून निर्गुंतवणूक करत आहे. २०२१-२२ च्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितल्यानुसार दोन सरकारी बँका आणि एलआयसीचे खासगीकरण करण्यात येणार आहे. देशात चार सरकारी विमा कंपन्या आहेत. तसेच देशात १२ सरकारी बँका असून त्यातील दोन बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. असे असले तरी सरकारने कोणत्या बँकाचे खासगीकरण होईल, हे स्पष्ट केले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com