मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांना झटका; 'या' व्याजदरात कपात

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

नवी दिल्ली: केंद्र सरकारने 'जनरल प्रोव्हिडंड फंड'च्या (जीपीएफ) व्याजदरात कपात केली आहे. इतरही काही राष्ट्रीय योजनांच्या व्याजदरात कपात झाली आहे त्याला अनुसरूनच ही कपात आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी  'जनरल प्रोव्हिडंड फंड' (जीपीएफ) आणि तत्सम योजनांचे व्याजदर 7.9 टक्के असणार आहेत. पूर्वी 8 टक्के असणारे व्याजदर आता 7.9 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. हे व्याजदर केंद्र सरकारचे कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि सैन्यदलांसाठी लागू होणार आहे. पीपीएफच्या व्याजदरांसारखाच हा व्याजदर असणार आहे. हा नवा व्याजदर 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी असणार आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने 'जनरल प्रोव्हिडंड फंड'च्या (जीपीएफ) व्याजदरात कपात केली आहे. इतरही काही राष्ट्रीय योजनांच्या व्याजदरात कपात झाली आहे त्याला अनुसरूनच ही कपात आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी  'जनरल प्रोव्हिडंड फंड' (जीपीएफ) आणि तत्सम योजनांचे व्याजदर 7.9 टक्के असणार आहेत. पूर्वी 8 टक्के असणारे व्याजदर आता 7.9 टक्क्यांवर आणण्यात आले आहे. हे व्याजदर केंद्र सरकारचे कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि सैन्यदलांसाठी लागू होणार आहे. पीपीएफच्या व्याजदरांसारखाच हा व्याजदर असणार आहे. हा नवा व्याजदर 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी असणार आहे. या व्याजदराचा परिणाम पुढील योजनांच्या व्याजदरांवर होणार आहे.

1. जनरल प्रोव्हिडंड फंड (जीपीएफ) (केंद्रीय सेवा)
2. कॉन्ट्रिब्युटरी प्रोव्हिडंड फंड
3. ऑल इंडिया सर्व्हिसेस प्रोव्हिडंड फंड
4. स्टेट रेल्वे प्रोव्हिडंड फंड
5. जीपीएफ (संरक्षण दले)
6. इंडियन ऑर्डन्स डिपार्टमेंट प्रोव्हिडंड फंड
7. इंडियन ऑर्डन्स फॅक्टरीज वर्कमेन्स प्रोव्हिडंड फंड
8. इंडियन नेव्ही डॉकयार्ड वर्कमेन्स प्रोव्हिडंड फंड
9. डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर्स प्रोव्हिडंड फंड
10. आर्म्ड फोर्सेस पर्सनल प्रोव्हिडंड फंड

याआधी केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठीच्या जीपीएफवरील व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर मात्र हे व्याजदर स्थिरच होते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी पीपीएफचे व्याजदर 7.9 टक्के असणार आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt cuts interest rate on General Provident Fund