रुपयाला सावरण्यासाठी आयात शुल्कात पुन्हा वाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली: केंद्र सरकारने  इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दूरसंचार उपकरणांवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चालू खात्यातील तूट (कॅड) आटोक्यात आणण्यासाठी आणि रुपयाला स्थिरता देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. आयात शुल्क आता 10 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर नेण्यात येणार आहे. आयात शुल्कावरील वाढ आजपासून (शुक्रवार) लागू करण्यात आली आहे. 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्या महिन्यातच वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, फुटवेअर, हिरे आणि जेट इंधनासह आणखी वस्तूंवरील आयात शुल्क वाढविले होते. त्यानंतर आता सलग दुसऱ्या महिन्यात   इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दूरसंचार उपकरणांवर आयात शुल्क वाढविण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात या 19 वस्तूंची आयात 86 हजार कोटी रुपयांची होती. चालू वर्षात आयात शुल्क वादतून सरकारला 3,400 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.  

अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने काही वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. आयात शुल्कात वाढ केल्याने या वस्तूंची आयात कमी होणार आहे. यामुळे चालू खात्यावरील तूट कमी होईल.

आयात शुल्कवाढ 

आधीचे शुल्क : 10 टक्के 

नवीन शुल्क : 20 टक्के 

चालू खात्यावरील तूट 

एप्रिल ते जून 2018 

- जीडीपीच्या 2.4 टक्के

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govt hikes import duty on electronic items, telecom gear to ease pressure on rupee