जीएसटीसाठी सरकारने उभारली ‘वॉर रूम’

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीसाठी काही तास शिल्लक राहीले आहे. त्यासाठी आता सरकारने कंबर कसली आहे. येत्या 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जीएसटी अंमलतबजावणीत कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये आणि काही समस्या निर्माण झाल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 'जीएसटी वॉर रूम'ची उभारणी केली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या या वॉर रूममध्ये जीएसटीशी निगडीत सर्व शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना देखील या वॉर रूममधून माहिती देण्यात येणार आहे. शिवाय त्यांना जीएसटी विषयी असलेल्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.

अबकारी आणि सीमा शुल्क विभागाच्या प्रमुख वनजा सरना म्हणाल्या की,'' देशात बर्‍याच वर्षांनी कर रचनेत मोठा बदल करण्यात येत आहे. त्यामुळे ऐतिहासिक अशा जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी आम्ही वॉर रूमची उभारणी केली आहे. शिवाय देशाच्या सर्व राज्यांमधील अधिकारी कोणत्याही भागांमधील तक्रारींसाठी वॉर रुमला संपर्क करु शकतील. आलेल्या तक्रारी तातडीने सोडवण्याचे काम वॉर रुममधील संबंधित अधिकारी करणार आहेत. सकाळी 8 पासून रात्री 10 वाजेपर्यंत या वॉर रूमशी संपर्क साधता येणार आहे.

Web Title: Govt launches 'War Room' for GST