कर न स्वीकारल्यास बँकाची मान्यता रद्द?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

बँकांकडे योग्य चलन नाही
अनेक बँका या योजनेअंतर्गत कर स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. बँका कर स्वीकारण्यासाठी योग्य चलन नसल्यामुळे आणि तांत्रिक कारणामुळे यास नकार देत आहेत. त्यामुळे सरकारने बँकांना आता कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कर न स्वीकारणाऱ्या बँकाच्या शाखांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. या योजनेची मुदत 31 मार्चला संपत आहे.

अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांच्या प्रमुखांना याविषयी सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत पैसे स्वीकारण्याबाबत सर्व शाखांना निर्देश द्यावेत आणि कर स्वीकारण्यासाठी आवश्‍यक ते बदल यंत्रणा आणि संगणक प्रणालीत करावेत, असे अर्थ मंत्रालयाने बँकांना सांगितले आहे. याचे पालन न करणे हा गंभीर प्रकार समजून बँकांच्या संबंधित शाखांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

नोटाबंदीनंतर सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणली आहे. यामध्ये बेहिशेबी पैसे 31 मार्चपर्यंत जमा करता येणार आहेत. या पैशांवर 50 टक्के कर आणि दंड द्यावा लागणार आहे. तसेच, या पैशांपैकी एक चतुर्थांश रक्कम बँकेत बिनव्याजी ठेव स्वरुपात ठेवावी लागणार आहे. ही योजना 1 डिसेंबरला सुरू झाली आहे.

 

Web Title: govt warns banks avoiding tax receipts