IPO अलर्ट : येत्या 7 जुलैला येतोय 'या' कंपनीचा IPO; जाणून घ्या सर्व माहिती

ipo
ipo Sakal

या महिन्याच्या 7 तारखेला GR Infraprojects चा IPO बाजारात येतोय. या आयपीओ च्या माध्यमातून कंपनी 963 कोटी रुपयांचं भांडवल उभं करणार आहे. गुंतवणूक करण्यासाठी ७ जुलै ते ९ जुलै पर्यंत हा IPO तुमच्या आमच्यासाठी खुला राहणार आहे. GR Infraprojects या कंपनीने या आयपीओ साठीची प्राईज बंद ही 828-837 रुपये प्रति शेअर इतकी ठेवली आहे. महत्त्वाची बाबा म्हणजे BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंजेसवर कंपनीची लिस्टिंग होणार आहे. त्यामुळे यंदा आयपीओ मध्ये गुंतवणूक करता आली नसेल तर तुम्ही यावर नजर ठेवू शकतात. (G R Infraprojects IPO to hit the market on 7 July. All you need to know)

ipo
दिवाळीत 'किती' होतील सोन्याचे दर, दिग्गजांनी दिलेत मोठे टार्गेट्स

जाणून घेऊयात या IPO बद्दल सर्वकाही

OFS म्हणजेच ऑफर फॉर सेल च्या माध्यमातून कंपनी 1.15 कोटी इक्विटी शेअर्स बाजारात आणणार आहे. GR Infraprojects या IPO च्या माध्यमातून ऑफर फॉर सेल (OFS) मधून 5 रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे 1.15 कोटी इक्विटी शेअर्स बाजारात आणणार आहे. हे इक्विटी शेअर्स कंपनीचे प्रमोटर्स आणि सध्याच्या गुंतवन्नुकदारांकडून जारी केले जातील. कंपनी या पब्लिक इश्यूसाठी कोणतेही नवीन शेअर्स बाजारात आणणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या सेक्टरमधील KNR कंस्ट्रक्शन्स, PNC इंफ्राटेक, HG इंफ्रा इंजीनिअरींग, दिलीप बिल्डकॉन, अशोक बिल्डकॉन, IRB इन्फ्रास्ट्रक्चर यासारख्या कंपन्या या आधीच बाजारात लिस्ट झालेल्या आहेत.

ipo
फिक्स्ड इन्कमसोबत टॅक्सही वाचवायचा आहे ? मग बँकांच्या या काही स्कीम्स नक्की पाहा...

कमीत कमी किती गुंतवणूक करता येईल

GR Infraprojects ने आईपीओची लॉट साईझ 17 शेअर्सची ठेवली आहे. कमीत कमी एक लॉट घेणं बंधनकारक आहे. यातील 837 रुपयांच्या प्राईज बँड नुसार तुम्हाला या IPO यामध्ये 14 हजार 076 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

कुणासाठी किती हिस्सा राखीव

या IPO यामधील 50 टक्के हिस्सा हा क्वालिफाईड संस्थात्मक खरेदीदारांची असणार आहे. तर 35 हिस्सा हा रिटेल गुंतवणूकदारांसाठी असणार आहे. 15 टक्के हिस्सा हा नॉन इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्स यांच्यासाठी राखीव असेल. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 2.25 लाख शेअर्स हे राखीवअसतील. त्यांना प्रति शेअर 42 रुपयांची सूटही मिळेल.

ipo
दहा मिनिटांत काढा इन्स्टंट पॅनकार्ड; असं करा अप्लाय

या IPO साठी GR Infraprojects ने HDFC Bank, ICICI सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा बँक आणि मोतीलाल ओसवाल या कंपन्यांना गुंतवणूक सल्लागार म्हणून नियुक्त केलं आहे. तर SBI कॅपिटल मार्केट्स आणि Enquires Capital बुक लीड रनींग मॅनेजर म्हणून काम पाहतील. KFin Technologies या IOP साठी रजिस्ट्रार असतील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चाकरूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com