‘एमएससीआय’ निर्देशांकात समावेशानंतर ‘ग्रासिम’चा शेअर 5 टक्के तेजीत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई: ग्रासिम इंडस्ट्रीजला 'एमएससीआय इंडिया' निर्देशांकात स्थान प्राप्त झाले आहे. यासंबंधी घोषणेनंतर आज(शुक्रवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा बदल 1 मार्चपासून लागू होणार आहे. या निर्देशांकात समाविष्ट झालेल्या कंपन्यांमधील गुंतवणूक वाढीस लागते. महिन्याच्या सुरुवातीला कंपनीच्या संचालक मंडळाने नोंदणीकृत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांसाठीची(आरएफपीआय) मर्यादा 30 टक्क्यांवरुन 49 टक्क्यांवर नेण्यास मंजुरी दिली होती.

डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला 728.19 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 13.69 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. याआधीच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला 640.47 कोटी रुपयांचा नफा मिळाला होता. या काळात कंपनीच्या विक्रीचे प्रमाण सुमारे एक टक्क्याने वधारुन 8495.36 कोटी रुपयांवर पोचले आहे.

मुंबई शेअर बाजारात आज(शुक्रवार) कंपनीचा शेअर 1010.30 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 1000 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 1023.80 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(12 वाजून 18 मिनिटे) 1007.20 रुपयांवर व्यवहार करत असून 3.63 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: grasim upward after msci index