Multibagger Penny Stock | लाखाच्या गुंतवणुकीत मिळाला 4 कोटीचा परतावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

penny-stocks

जोपर्यंत कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि नफा टिकून आहे असे दिसते, तोपर्यंत शेअरमध्ये गुंतवणूक करत राहावे असे काही दिग्गज गुंतवणूकदार सांगतात.

लाखाच्या गुंतवणुकीत मिळाला 4 कोटीचा परतावा

पेनी स्टॉकमध्ये (Penny stock) गुंतवणूक (Investment) करणे धोकादायक असते, विशेषत: लाँग टर्मसाठी (Long term) गुंतवणूक करताना हा धोका जास्त वाढतो. पण काही गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून, अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासारखे आहे. जोपर्यंत कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि नफा टिकून आहे असे दिसते, तोपर्यंत शेअरमध्ये गुंतवणूक करत राहावे असे काही दिग्गज गुंतवणूकदार सांगतात.

आज आपण जीआरएम ओव्हरसीजच्या (GRM Overseas) पेनी स्टॉकबद्दल बोलत आहोत. स्मॉल-कॅप राइस मिलिंग कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या 10 वर्षांत 1.93 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच यात सुमारे 40,450 टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा: 2022 मध्ये 'हे' 3 स्टॉक्स मल्टीबॅगर पेनी स्टॉक बनू शकतात

जीआरएम ओव्हरसीजच्या (GRM Overseas) शेअरचा इतिहास

गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 505 रुपयांवरून 782 रुपयांपर्यंत 55 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक सुमारे 156 रुपयांवरून 782 रुपयांपर्यंत वाढला असून, या कालावधीत 400 टक्क्यांनी वधारला आहे. हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या एका वर्षात 34.44 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे, म्हणजेच या काळात जवळपास 2200 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 5 वर्षांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 4.49 रुपयांवरून 782.40 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत जवळपास 17,325 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्याचप्रमाणे, हा स्टॉक 1.93 रुपयांवरून (10 जानेवारी 2012 रोजी) 782.40 (14 जानेवारी 2022 रोजी) पर्यंत वाढला आहे. याचा अर्थ जवळपास एक दशकाच्या काळात हा पेनी स्टॉक जवळपास 405 पटीने वाढला आहे.

हेही वाचा: 2022 मध्ये धमाका उडवणारा मल्टीबॅगर स्टॉक तुमच्याकडे आहे का?

गुंतवणूकदारांचा फायदा

GRM ओव्हरसीजच्या शेअरची किंमत पाहता, जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या 1 लाख रुपयाचे 1.55 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या राईस मिलिंग पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 5 लाख रुपये झाले असते, तर गेल्या एका वर्षात ते 23 लाख रुपयांवर गेले असते.

त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते तसेच ठेवले असते तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.74 कोटी रुपये झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि हा स्टॉक 1.93 रुपयांच्या पातळीवर विकत घेतला असता, तर आज त्याचे 1 लाख रुपये 4.05 कोटी झाले असते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top