5 वर्षात 1 लाखाचे 94 लाख, तब्बल 9300 टक्के परतावा, कोणता आहे हा स्टॉक?

जीआरएम ओव्हरसीज (GRM Overseas) शेअर हा असाच एक शेअर आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे.
Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market Latest Updates | Stock Market NewsSakal

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे मानले जाते. कारण त्यात अस्थिरता अतिसय जास्त असते. पण मोठी जोखम घेणारे ट्रेडर्स अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणि त्यात मिडियम ते लाँगटर्मसाठी हे शेअर्स होल्ड करतात. पण पैसे गुंतवण्याआधी त्यांना कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि सतत होणारी वाढ चांगल्याप्रकारे कळते. हीच रणनीती अशा रिस्क घेणाऱ्या ट्रेडर्सना प्रचंड परतावा देतात. जीआरएम ओव्हरसीज (GRM Overseas) शेअर हा असाच एक शेअर आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात हा स्टॉक 6 वरून 565 रुपयांपर्यंत वेगाने वाढला आहे. या कालावधीत त्यात सुमारे 9300 टक्के वाढ झाली आहे. (GRM Overseas Share is one such stock that has given strong returns to its investors)

Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market : शेअर बाजारात घसरण! सेन्सेक्स 114 तर निफ्टी 43.45 अंकांच्या घसरणीसह सुरु

एक लाखाचे 5 वर्षात 94 लाख-

एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकमध्ये 6 महिन्यांसाठी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या 1 लाखाचे 2.70 लाख झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 4.45 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 94 लाख झाले असते.

Share Market Latest Updates | Stock Market News
Share Market: आज कोणते शेअर करतील मालामाल? या 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच हा शेअरमध्ये विक्री होत आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 5 टक्क्यांच्या जवळपास घसरला आहे. तर यावर्षी आतापर्यंत हा मल्टीबॅगर स्टॉक 14 टक्क्यांच्या तोट्यासह 655 रुपयांवरून 565 रुपयांवर घसरला आहे. गेल्या 6 महिन्यांत तो 210 रुपयांवरून 565 रुपयांपर्यंत 170 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या एका वर्षात, हा स्टॉक 565 रुपयांवर पोहोचला आहे, जो सुमारे 125 रुपयांवरून 345 टक्क्यांनी वाढला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com