विकासदर सात टक्के राहील: राजीव कुमार 

विकासदर सात टक्के राहील: राजीव कुमार 

मुंबई: चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली असला तरी दुसऱ्या सहामाहीत विकासदर सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असा विश्‍वास निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे. 

खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाल्यास ओघ वाढेल, असे त्यांनी सांगितले. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत विकासदर सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल. ज्यातून वर्षभराचा विकासदर 6 टक्के राहील, असे कुमार यांनी म्हटले आहे.

पहिल्या सहामाहीत जीएसटी कर संकलन कमी झाले आहे. मात्र कर संकलन वाढवण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती कुमार यांनी दिली. निर्गुंतवणूक आणि मालमत्ता विक्रीसारख्या पर्यायांमधून सरकारला अपेक्षित निधी मिळेल, असे कुमार यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com