लक्झरी गाड्यांच्या किंमतीत होणार भरघोस वाढ

car
car

नवी दिल्ली: संसदेच्या कनिष्ट सभागृह असलेल्या लोकसभेने लक्झरी गाडयांवरील उपकर (सेस) वाढवण्यास परवानगी दिली आहे. लक्झरी गाडयांवरील कर आता 15 टक्क्यांवरून वाढवून 25 टक्के होणार आहे.

जीएसटीअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात 80 हजार 800 कोटी रुपयांची वसुली झाली. जी गेल्या 4 महिन्यातील सर्वांत कमी वसुली ठरली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, लक्झरी गाडयांवरील कर वाढविल्यानंतर गोळा केलेला निधी  राज्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वापरले जाणार आहे. जीएसटी कौन्सिल आणि राज्यांचे अर्थमंत्री प्रत्येक महिन्याला भेटून महसूल संकलन वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा करणार आहे. 

लोकसभेत चर्चा सुरू असताना सॅनिटरी नॅपकिन्स, शेतीची उपकरणे, हस्तकला, ​​हातमाग वस्तू आणि क्रीडासाहित्य यांसारख्या विविध वस्तूंवर जीएसटी कमी करणे आवश्यक असल्याचे लोकसभेतील काही सदस्यांनी सुचविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com