जीएसटी संकलन जुलैमध्ये ९६,४८३ कोटी रुपयांवर 

GST
GST

नवी दिल्ली  - वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन जुलै महिन्यात वाढले असून, ते ९६ हजार ४८३ कोटी रुपये झाले आहे. जून महिन्यात जीएसटी संकलन ९५ हजार ६१० कोटी रुपये झाले होते. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये ‘जीएसटीआर ३१बी’ विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या वाढली असून, ती ६६ लाखांवर पोचली आहे. त्याआधीच्या जून महिन्यात ही संख्या ६४.४९ लाख होती. जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन ९६ हजार ४८३ कोटी रुपये आहे. यात केंद्र जीएसटी १५ हजार ८७७ कोटी, राज्य जीएसटी २२ हजार २९३ कोटी, एकात्मिक जीएसटी ४९ हजार ९५१ कोटी आणि उपकर ८ हजार ३६२ कोटी रुपये (आयातीवर ७९४ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

जुलैमधील संकलन अपेक्षेएवढे झाले आहे. एप्रिल ते मे या कालावधीत राज्यांना ३ हजार ८९९ कोटी रुपये जीएसटी भरपाई म्हणून देण्यात आले आहेत. नुकतीच ८८ वस्तूंवरील जीएसटीमध्ये कपात करण्यात आली होती. याचा परिणाम संकलनावर झालेला दिसून आलेला नाही. वॉशिंग मशिन, फ्रिज, मिक्‍सर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू तसेच, एक हजार रुपयांपर्यंतची पादत्राणे, रंग, व्हॅर्निश आणि सॅनिटरी नॅपकिन्स यावरील जीएसटीमध्ये २७ जुलैपासून कपात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com