‘जीएसटी’ संकलन एक लाख कोटींवर - जेटली

‘जीएसटी’ संकलन एक लाख कोटींवर - जेटली

नवी दिल्ली - वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) संकलनाने ऑक्‍टोबरमध्ये एक लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी दिली. 

जीएसटीतून सप्टेंबरमध्ये ९४ हजार ४४२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. एप्रिल महिन्यानंतर प्रथमच जीएसटी संकलनाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यानंतर तो ९० हजार कोटी रुपयांच्या पातळीवर आहे. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थ मंत्रालयाने जीएसटी संकलनाचे दरमहा एक कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. जीएसटी संकलन मे महिन्यात ९४ हजार १६ कोटी, जूनमध्ये ९५ हजार ६१० कोटी, जुलैमध्ये ९६ हजार ४८३ कोटी, ऑगस्टमध्ये ९३ हजार ९६० कोटी आणि सप्टेंबरमध्ये ९४ हजार ४४२ कोटी रुपये होते. 

जीएसटी संकलनाने ऑक्‍टोबरमध्ये एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. कमी कर, अतिशय कमी कर चुकवेगिरी, केवळ एकच कायदा आणि कर अधिकाऱ्यांचा कमी हस्तक्षेप यामुळे जीएसटीला यश मिळाले आहे. 
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com