"जीएसटी"पूर्वी सेलचा धमाका 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

मुंबई: वस्तू व सेवा कर(जीएसटी) लागू होण्याआधी शिल्लक मालाचा साठा विक्री करण्याच्यादृष्टीने ई-कॉमर्स कंपन्यांनी आणि किरकोळ विक्रेत्यांनी वस्तूंवर 30 टक्‍क्‍यांपासून 60 टक्‍क्‍यांपर्यंत सवलती जाहीर केल्या आहेत. तयार कपडे, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रॉनक्‍सि वस्तूंवर घसघशीत सूट देण्यात आली आहे.

 "जीएसटी"मध्ये 5 टक्‍क्‍यांपासून 28 टक्‍क्‍यांपर्यंत कर लावला जाणार आहे. त्यामुळे तयार कपडे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू महागणार आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांनी मॉन्सून आणि प्री-जीएसटी सेल जाहीर केला आहे. ऍमेझॉन, स्नॅपडील, पेटीएम आणि मिंत्रा यासारख्या वेबसाईट्‌सवर ग्राहकांना कपड्यांपासून बुटांपर्यंत सर्व ब्रॅंड्‌सवर 50 ते 80 टक्‍क्‍यांची सवलत दिली जात आहे. याशिवाय, इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्पादनांवरदेखील तब्बल 80 टक्के सवलत दिली आहे. 

Web Title: before "GST" monsoon sale dhamaka