विक्रमी जीएसटी वसुलीने वर्षाचा सुखद शेवट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gst
विक्रमी जीएसटी वसुलीने वर्षाचा सुखद शेवट

विक्रमी जीएसटी वसुलीने वर्षाचा सुखद शेवट

नवी दिल्ली - डिसेंबरमध्ये १.२९ लाख कोटी रुपये जीएसटी वसुल (GST Recovery) झाल्याने सरकारसाठी (Government) आर्थिकदृष्ट्या २०२१ चा शेवट सुखद ठरला आहे. महाराष्ट्रातून १८,६५६ कोटी रुपये जीएसटी वसूल झाला आहे. राज्यात २०२० च्या डिसेंबरमधील वसुली १५,००१ कोटी रुपयांची होती. त्यातुलनेत महाराष्ट्रातील यंदाची वाढ २४ टक्क्यांची आहे.

अर्थमंत्रालयाने डिसेंबरमधील जीएसटी वसुलीची आकडेवारी आज जाहीर केली. यानुसार १,२९,७८० कोटी रुपये महसूल मिळाला आहे. यात केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) २२५७८ कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) २८,६५८ कोटी रुपये आणि आंतरराज्यीय मालवाहतुकीवर आयजीएसटी ६९१५५ कोटी रुपयांचा समावेश आहे. अर्थात आयजीएसटीअंतर्गत माल आयातीतून मिळालेल्या ३७,५२७ कोटी रुपयांचाही त्यात समावेश आहे. तर उपकरातून ९३८९ कोटी रुपये मिळाले आहेत. सरकारने आयजीएसटीमधून केंद्रीय जीएसटीचा २५५६८ कोटी रुपयांचा आणि राज्य जीएसटीचा २११०२ कोटी रुपयांचा हिशेब चुकता केला आहे. या हिशेबानंतर केंद्र आणि राज्य सरकारांना सीजीएसटीच्या माध्यमातून ४८,१४६ कोटी रुपये तर एसजीएसटीच्या माध्यमातून ४९,७६० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.

हेही वाचा: क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजने जीएसटी चुकवल्याचे उघड

अर्थमंत्रालयाने म्हटले आहे, की २०२० च्या डिसेंबरमध्ये जीएसटीतून जेवढा महसूल मिळाला होता त्यातुलनेत यंदाची वसुली १३ टक्क्यांनी वाढीव आहे. तर २०१९ मधील याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ २६ टक्क्यांची आहे. त्याचप्रमाणे वस्तु आयातीतून मिळालेला महसूल देखील डिसेंबरमध्ये ३६ टक्क्यांनी अधिक आहे. तर सेवा आयातीसह देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या महसुलामध्येही डिसेंबर २०२०च्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढ झाली.

बनावट बिलाविरुद्ध कारवाईने वसूलीत वाढ

ई-वे बिलचे प्रमाण नोव्हेंबरच्या तुलनेत १७ टक्क्याने कमी होऊनही डिसेंबरमध्ये जीएसटी वसुली १.३० लाख कोटींच्या जवळपास पोचली आहे. २०२१-२२ आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जीएसटी वसुलीने १.३० लाख कोटी रुपयांची सरासरी गाठली आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीमधील वसुली १.१० लाख कोटी रुपये तसेच १.१५ लाख कोटी रुपये होती. बनावट बिलांविरुद्ध, करचोरीविरुद्ध कारवाईमुळे जीएसटी वसुली वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :New yearGST
loading image
go to top