ITR Refund | करदात्यांनो! अद्याप Refund मिळाला नाही का? मग नक्की वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income tax return

कारण याची अनेक कारणे असू शकतात. तुमच्या रिफंडचे स्टेटस काय आहे ते जाणून घ्या या काही स्टेप्समधून...

ITR Refund: करदात्यांनो! अद्याप Refund मिळाला नाही का? मग नक्की वाचा

तुम्ही आयकर रिटर्न (Income Tax Return) भरुनही परतावा (Refund) आला नाहीय का, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण याची अनेक कारणे असू शकतात. तुमच्या रिफंडचे स्टेटस काय आहे ते जाणून घ्या या काही स्टेप्समधून...

हेही वाचा: दिलासा! ITR भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ; जाणून घ्या नवी तारीख

6.25 कोटी करदात्यांकडून रिटर्न फाईल-

इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या नव्या संकेतस्थळ अर्थात वेबसाईटमुळे रिटर्न फाईल करणे खूप सोपे झाले आहे. तेव्हापासून कागदाशी संबंधित कामाचा त्रास संपला. त्यातच करदात्यांना नेहमीच सल्ला दिला जातो की त्यांनी वेळेवर आयटीआर (ITR) भरावा. कारण तुम्ही जितक्या लवकर रिटर्न फाइल कराल तितक्या लवकर तुम्हाला तुमचा परतावा मिळेल.

तांत्रिक बिघाड-

प्राप्तिकर विभागाने जून 2021 मध्ये एक नवीन पोर्टल लाँच केले होते, त्यानंतर लॉन्च झाल्यानंतर काही दिवस तांत्रिक समस्या होत्या. यासंबंधीच्या समस्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या. अशा परिस्थितीत तुमचा आयटीआर रिफंड यामुळे अडकू शकतो.

हेही वाचा: ITR भरताना आला एरर! टॅक्सपेअरने वाढवून मागितली मुदत

कागदपत्रांची अपूर्णता-

जर तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे जमा केली नसतील, तर तेही रिफंड न मिळण्याचे एक कारण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आयकर विभागाच्या अधिकाऱ्याशी बोलू शकता.

वेरिफिकेशनचा अभाव-

जर तुमचा आयटीआर निर्धारित कालावधीत वेरिफाय केला गेला नाही, तर तो अवैध (Invalid) मानला जाईल.

हेही वाचा: तुम्ही आयकरच्या कक्षेत येत नसाल तरी करा ITR फाईल! जाणून घ्या फायदे

CBDT कडून आकडेवारी जाहीर-

'CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 20 मार्च 2022 दरम्यान 2.26 कोटी करदात्यांना 1,93,720 कोटी रुपयांचा परतावा जारी केल्याचे ट्विट आयकर विभागाने केले. यामध्ये 70,977 कोटी रुपयांचा वैयक्तिक आयकर परतावा आणि 1,22,744 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परताव्या समावेश आहे.

आयकर परताव्याची स्थिती (Income Tax Refund status) कशी तपासायची?

खालील स्टेप्स फॉलो करा

- सर्व प्रथम www.incometax.gov.in वर जा.

- यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.

- 'ई-फायलिंग' वर क्लिक करा आणि 'इन्कम टॅक्स रिटर्न' निवडा.

- 'View File Return' वर क्लिक करा.

- ETR डिटेल्स स्क्रीनवर डिस्प्ले होईल.

Web Title: Have You Not Received The Return Even After Filing The Income Tax Return

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..